‘बजरंगी’ बाहुबलीवर भारी

By Admin | Updated: July 19, 2015 04:18 IST2015-07-19T04:18:55+5:302015-07-19T04:18:55+5:30

ईदच्या एक आठवड्यापूर्वी दक्षिण भारतीय बिग बजेट फिल्म बाहुबली रिलीज झाला. त्या वेळी कुणालाच विश्वास नव्हता हिंदी सिनेमा बाजारात याला मोठे यश मिळेल. पहिल्याच आठवड्यात

'Bajrangi' Bahubali heavy | ‘बजरंगी’ बाहुबलीवर भारी

‘बजरंगी’ बाहुबलीवर भारी

ईदच्या एक आठवड्यापूर्वी दक्षिण भारतीय बिग बजेट फिल्म बाहुबली रिलीज झाला. त्या वेळी कुणालाच विश्वास नव्हता हिंदी सिनेमा बाजारात याला मोठे यश मिळेल. पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने ४२ कोटींच्या जवळपास व्यवसाय करून सर्वांना आश्चर्यात टाकले. बजरंगी झालेल्या सलमान खानच्या फॅन्सने हे दाखवून दिलेय की, जेव्हा भाईजानचा सिनेमा रिलीज होतो त्या वेळी त्याच्यासमोर कुणीच टिकाव धरू शकत नाही.

हे खरे आहे, ईदच्या पूर्वी मागील आठवड्यात बाहुबलीने बॉक्स आॅफिसवर मोठी कमाई केली. साऊथच्या या सिनेमाने हिंदी सिनेमा बाजाराला हालवून टाकले. बाहुबलीच्या निर्मात्यांनादेखील हिंदी सिनेमा बाजारात येवढे यश मिळेल याची शाश्वती नव्हती. मात्र ईदला सलमानचाच जलवा पुन्हा एकदा सिद्ध झालाय.
बाहुबलीच्या यशाचा रथ थांबविण्यासाठी ‘बजरंगी’च्या टीमने कोणती तयारी केली ज्यामुळे बाहुबलीचा क्रेझ हिंदी सिनेमात कमी झाली. जाणकारांच्या मते, यात कोणतेही आश्यर्च नाही, हिंदी सिनेमाचे वितरक ईद आणि सलमान खानचा चित्रपट या दोन्ही गोष्टींसाठी कोणतीच रिस्क घेण्यास तयार नव्हते.
बाहुबलीच्या टीमला हे सांगण्यात आले होते की, आठवडाभरानंतर त्याच्या स्क्रीनवर बजरंगी रिलीज केली जाईल. बाहुबलीच्या टीमलादेखील सलमान व त्याच्या फॅन्सची ताकद माहिती होतीच, यामुळे तेदेखील यासाठी तयारच होते. बाहुबलीच्या टीमला हिंदी बेल्टमध्ये आपल्याला एका आठवड्याचा वेळ मिळणार याची जाणीव होती. या काळात मिळालेल्या रिस्पाँसमुळे तेदेखील खूश असल्याचे त्यांनी सांगितले. सलमानदेखील मागे राहिला नाही, त्याने बाहुबलीने मिळविलेल्या यशाची प्रशंसा केली आहे. बजरंगी टीमच्या मते भार्इंना कोणतेच टेन्शन नव्हते, कारण शुक्रवारपासून हिंदी सिनेमात त्यांचीच चर्चा होणार आहे. नेमके तेच झाले. बाहुबलीच्या जागेवर आता बजरंगी भाईजानचा डंका वाजतो आहे.

बाहुबलीच्या यशामुळे ईदच्या पर्वावर सलमान खानचा बजरंगी भाईजानच्या यशावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत होते. सलमानचा ‘बजरंगी’ बाहुबलीचा रथ रोखण्यात यशस्वी होणार काय, असा प्रश्न केला जात होता. मात्र सारे अंदाज चुकवत बजरंगी भाईजानने सिनेमा बाजारात अशी धमाल के ली की, बाहुबलीचा रंग फिका पडायला लागला आहे. विशेषत: हिंदी भाषी पट्ट्यात बजरंगीने अशी कमाल केली की, बाहुबली मागे पडला. बॉक्स आॅफिसचे जानकार याला चमत्कार मानू लागले आहेत. त्यांच्या मते, सलमान खानचा चित्रपट व ईदच्या पर्वावर ‘बजरंगी भाईजान’चे रिलीज कमाल तर करणारच होते. याची जाणीव बाहुबलीच्या निर्मात्यांना आधीपासूनच असावी, मागच्या शुक्रवारी ज्या सिनेमाघरांत बाहुबली होती, नेमक्या त्याच स्क्रीनवर बजरंगी भाईजानने कब्जा मिळविला आहे.

‘बजरंगी’च्या प्रीमियरला तारे-तारकांची वर्णी ...
सलमान खानचा बहुचर्चित असलेला चित्रपट ‘बजरंगी भाईजान’ मोठ्या उत्सुकतेनंतर प्रदर्शित झाला. चाहत्यांसोबतच सलमानही चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तेवढाच उत्सुक होता. चित्रपट थिएटरमध्ये जाण्याअगोदर सलमानच्या काही खास मित्रांसाठी एक प्रीमियर शो दाखवण्यात आला. या वेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, कबीर खानची पत्नी मिनी माथूर, अल्विरा खान, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, इमरान खान, फराह खान, संगीता बिजलानी, टिस्का चोप्रा, अनु मलिक, पुनीत मल्होत्रा, डिनो मोरिआ, रणवीर सिंह, हर्षाली मल्होत्रा, आयुषमान खुराणा आदी बॉलीवूडमधील तारे-तारका प्रीमियरसाठी आले होते. ‘बजरंगी’ने अत्यंत उत्तम कथानक, कास्टिंग, अभिनय, शूटिंग याविषयी सर्व अभिनेते-अभिनेत्रींकडून वाहवा मिळवली. मूकबधिर मुलीला तिच्या वडिलांना भेटवण्यासाठी पवनकुमार पाकिस्तानात जातो. या कथानकाभोवती फिरणाऱ्या चित्रपटात उत्तम दर्जाचा अभिनय पाहावयास मिळत आहे.

Web Title: 'Bajrangi' Bahubali heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.