अझरुद्दीनचे इम्रानला क्रिकेटचे धडे
By Admin | Updated: January 28, 2015 00:31 IST2015-01-28T00:31:17+5:302015-01-28T00:31:17+5:30
या चित्रपटात अझरुद्दीनच्या भूमिकेत अभिनेता इम्रान हाश्मी असून आता अझरुद्दीनकडून इम्रानला क्रिकेटचे धडे मिळताहेत.

अझरुद्दीनचे इम्रानला क्रिकेटचे धडे
बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक फिल्म्सची रीघ लागली आहे. ‘मेरी कॉम’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘चक दे इंडिया’नंतर आता प्रसिद्ध क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनच्या आयुष्यावर बॉलीवूडमध्ये नव्या बायोपिकची तयारी ‘जोरोशोरो’से सुरू आहे. या चित्रपटात अझरुद्दीनच्या भूमिकेत अभिनेता इम्रान हाश्मी असून आता अझरुद्दीनकडून इम्रानला क्रिकेटचे धडे मिळताहेत. इम्रानव्यतिरिक्त अझरुद्दीनच्या पहिला पत्नीच्या भूमिकेसाठी प्राची देसाईचे नाव चर्चेत आहे. तर दुसऱ्या पत्नीच्या रोलमध्ये करिना कपूर-खान दिसण्याची शक्यता आहे.