अथियाचे रिटेक्सवर रिटेक्स; दिग्दर्शक वैतागले!
By Admin | Updated: May 7, 2017 00:00 IST2017-05-07T00:00:55+5:302017-05-07T00:00:55+5:30
सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी सध्या दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या ‘मुबारका’मध्ये काम करतेय, हे तुम्ही जाणताच. याच

अथियाचे रिटेक्सवर रिटेक्स; दिग्दर्शक वैतागले!
सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी सध्या दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्या ‘मुबारका’मध्ये काम करतेय, हे तुम्ही जाणताच. याच चित्रपटाच्या सेटवरून एक बातमी आलीय. पण, ही बातमी बऱ्याच अंशी अथियाच्या चाहत्यांना निराश करणारी आहे. होय, सेटवरच्या सूत्रांचे मानाल, तर अनीस बज्मी अथियामुळे जाम वैतागले आहेत.
केवळ इतकेच नाही, तर ‘तुला आणखी बरेच काही शिकायचे आहे,’ असे त्यांनी अथियाला सांगून टाकले आहे. झाले असे, की ‘मुबारका’च्या सेटवर अथियाचे रिटेक्सवर रिटेक्स होत आहेत. अनीस बज्मी यांना मनासारखा सीन मिळत नाहीये. शिवाय, या सगळ्यांत अख्ख्या युनिटाचा वेळ जातोय. अर्जुन कपूर, अनिल कपूर, इलियाना डिक्रूज यांचाही वेळ वाया जातोय. एकंदर काय, तर अनीस बज्मी अथियाच्या अॅक्टिंग स्किलबद्दल जराही समाधानी नाहीत. अथियाकडून मनासारखे काम काढून घेण्यास त्यांना बराच घाम गाळावा लागतोय.