अशोक शिंदेंचे कमबॅक!
By Admin | Updated: March 3, 2015 23:16 IST2015-03-03T23:16:48+5:302015-03-03T23:16:48+5:30
दूरचित्रवाणी मालिकांमध्ये व्यस्त असलेले अभिनेते अशोक शिंदे यांनी गेल्या वर्षी रंगभूमीवर पुनश्च एन्ट्री घेतली आणि आता तब्बल ६ वर्षांनी ते रुपेरी पडद्यावर पुनरागमन करीत आहेत.

अशोक शिंदेंचे कमबॅक!
दूरचित्रवाणी मालिकांमध्ये व्यस्त असलेले अभिनेते अशोक शिंदे यांनी गेल्या वर्षी रंगभूमीवर पुनश्च एन्ट्री घेतली आणि आता तब्बल ६ वर्षांनी ते रुपेरी पडद्यावर पुनरागमन करीत आहेत. नव्या भूमिकेसाठी त्यांनी ‘काकण’ या चित्रपटाची निवड केली असून, त्यात त्यांनी आगळीवेगळी भूमिका रंगवल्याची चर्चा आहे. मालिकांच्या व्यापातून वेळ काढत त्यांनी या चित्रपटासाठी केलेले कमबॅक नक्की काय आहे, हे पाहण्यासाठी चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.