अर्जुन - श्रद्धाचा ‘बारिश’ रोमान्स!

By Admin | Published: April 15, 2017 12:31 AM2017-04-15T00:31:53+5:302017-04-15T00:31:53+5:30

अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. चेतन भगत यांनी लिहिलेल्या नॉवेलच्या पानांवरचे नातेसंबंध आणि भावनांची

Arjun - Rainstorm 'Rain' Romance! | अर्जुन - श्रद्धाचा ‘बारिश’ रोमान्स!

अर्जुन - श्रद्धाचा ‘बारिश’ रोमान्स!

googlenewsNext

अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. चेतन भगत यांनी लिहिलेल्या नॉवेलच्या पानांवरचे नातेसंबंध आणि भावनांची कथा अर्जुन व श्रद्धा मोठ्या पडद्यावर जिवंत करणार आहेत. अशावेळेस रोमान्ससोबत जुने नाते असलेल्या पावसाला विसरून कसे चालेल? आम्ही बोलतोय ते, ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या रिलीज झालेल्या ‘बारिश’ या गाण्याबद्दल. खरे तर सध्या गर्मीचे दिवस आहेत. अशात माधव (अर्जुन कपूर) आणि रिया (श्रद्धा कपूर) यांचा पावसातील रोमान्स नक्कीच पाहण्यासारखा आहे. सेंट्स स्टिफेन्सची हाय सोसायटी गर्ल रिया आणि सर्वसाधारण कुटुंबातील माधव यांच्यातील रोमान्स फुलवणारे हे गाणे ऐश किंग आणि साशा तिरुपतीने गायले आहे. तनिष्क बागचीने ते कम्पोज केले आहे. माधव मनातल्या मनात रियावर प्रेम करू
लागतो आणि मग अनेक प्रयत्नानंतर बॉस्केटबॉलच्या माध्यमातून दोघांची मैत्री होते, असे या गाण्यात दाखवले आहे. या गाण्याचे संगीत आणि यातील स्पेशल इफेक्ट्स बघण्यासारखे आहेत.

Web Title: Arjun - Rainstorm 'Rain' Romance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.