क्या आपको यकीन है ?, सलमान खानच्या "ट्यूबलाईट"चा पोस्टर रिलीज

By Admin | Updated: April 19, 2017 12:11 IST2017-04-19T12:06:19+5:302017-04-19T12:11:27+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आगामी चित्रपट "ट्यूबलाईट"चा पहिला पोस्टर रिलीज करण्यात आला आहे

Are you sure?, Salman Khan's "tubelight" poster release | क्या आपको यकीन है ?, सलमान खानच्या "ट्यूबलाईट"चा पोस्टर रिलीज

क्या आपको यकीन है ?, सलमान खानच्या "ट्यूबलाईट"चा पोस्टर रिलीज

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आगामी चित्रपट "ट्यूबलाईट"चा पहिला पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. मंगळवारी चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आल्यानंतर बुधवारी हा पोस्टर रिलीज करण्यात आला. सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान "क्या आपको यकीन है ?" असा प्रश्न विचारताना दिसत आहे. मात्र चाहत्यांना अद्याप सलमान खानची झलक पहायला मिळाली नसून त्यांना अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.
 
 
हा सिनेमा 23 जून रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती ट्विटरवर दिली होती. इंडो-चायनिज प्रोजेक्ट ट्युबलाइट सिनेमाचं दिग्दर्शन कबीर करत आहेत. 2017 मधील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा हा सिनेमा आहे. कबीर यांनी ट्युबलाइट सिनेमापूर्वी "एक था टायगर" आणि "बजरंगी भाईजान" सारखे ब्लॉकबस्टर सिनेमा दिले आहेत. 
 
 हा सिनेमा एका युद्धकहाणीवर चित्रित करण्यात आला आहे. सिनेमाचे बरेचसे शुटिंग लडाख आणि मनाली परिसरात करण्यात आलं आहे.  दरम्यान, या सिनेमानं रिलीजपूर्वीच 20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाचे म्युझिक राईट्स सोनीनं 20 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. विशेष म्हणजे सिनेमामध्ये केवळ तीनच गाणी आहेत. 
 

शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत?
सिनेमामध्ये सलमान खान एक जवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान व्यतिरिक्त सिनेमात दिवंगत अभिनेते ओम पुरी (त्यांचा शेवटचा सिनेमा), सोहेल खान आणि चीनमधील अभिनेत्री झूझू यांनी महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या ट्युबलाइट सिनेमात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 
 

Web Title: Are you sure?, Salman Khan's "tubelight" poster release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.