मलाइका पासून अरबाज लवकरच घेणार घटस्फोट !
By Admin | Updated: August 17, 2016 17:50 IST2016-08-17T17:50:02+5:302016-08-17T17:50:02+5:30
गेल्या काही दिवसांपासून अरबाज खान आणि 'छैंया छैंया' गर्ल मलायका अरोरा यांच्या घटस्फोटासंदर्भात सुरू असणाऱ्या चर्चेला आज अखेर पुर्णविराम मिळाला आहे.

मलाइका पासून अरबाज लवकरच घेणार घटस्फोट !
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ : गेल्या काही दिवसांपासून अरबाज खान आणि 'छैंया छैंया' गर्ल मलायका अरोरा यांच्या घटस्फोटासंदर्भात सुरू असणाऱ्या चर्चेला आज अखेर पुर्णविराम मिळाला आहे. मलायका आणि मी आता एकत्र राहत नाही. लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे अरबाडने एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले आहे.
जानेवारीच्या अखेर अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनी आपले १७ वर्षे जूने नाते संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त माध्यमात झळकत होते. मात्र, मार्चच्या अखेरपर्यंत त्यांनी यावर मौन बाळगले होते. मात्र आज अरबाज खानने आम्ही वेगळ झालो असल्याची कबूली दिली आहे. तो एका पत्रकार परिषदेत बोलत होता. त्यावेळी त्याने सांगितले. तो म्हणाला, आम्ही दोघे सध्या एकत्र राहत नाही, लवकरच घटस्फोट घेतला जाईल.
मागील सहा महिन्यांपासून मलायका अरबाजपासून वेगळी राहत आहे. ती खारमधील भाड्याच्या घरात मुलगा अरहानसोबत राहत आहे. त्याच अपार्टमेंटमध्ये मलायकाची बहीण अमृता राहते; मात्र मलायका तिच्याकडे राहत नाही. अमृताने वाढदिवसानिमित्त दुबईत दिलेल्या पार्टीलाही मलायका गेली नव्हती. या पार्टीला अरबाज उपस्थित होता. नणंद अर्पिताच्या डोहाळे जेवणालाही मलायका गैरहजर राहिली होती.
५ वर्ष एकमेंकाच्या प्रेमात अखंड बुडाल्यानंतर १२ डिसेंबर १९९८ रोजी मलायका व अरबाज लग्नाच्या बंधनात अडकले होते. १८ वर्षांमध्ये त्या दोघांमध्ये खटके उडाल्याचे ऐकिवात नव्हते. अलीकडे ते दोघे पॉवर कपल या रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन करत होते; मात्र जेमतेम तीन भागच ते एकत्र होते. शोसाठी येताना दोघेही वेगवेगळ्या गाडीतून येत असत. त्या वेळी या दोघांमध्ये खटके उडाल्याची चर्चा होती.
सलीम खान आणि सलमान खान यांनीही दोघात तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता.