१४0 ड्रेसेसमध्ये दिसणार अनुष्का
By Admin | Updated: May 29, 2014 15:11 IST2014-05-29T15:06:54+5:302014-05-29T15:11:00+5:30
अनुष्का शर्माचे यावर्षी दोन मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. बॉम्बे वेलवेट’ या चित्रपटात ती४0 ड्रेसेसमध्ये दिसणार आहे.

१४0 ड्रेसेसमध्ये दिसणार अनुष्का
अनुष्का शर्माचे यावर्षी दोन मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. ‘पिके’ या चित्रपटात तिने आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानीसोबत काम केले आहे. तसेच ‘बॉम्बे वेलवेट’ या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत काम करीत आहे. अनुराग कश्यपने ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात
५0 आणि ६0 दशकातील मुंबई दाखवण्यात आली आहे. त्या काळातील एका यशस्वी गायिकेची भूमिका ती साकार करीत आहे. तिच्या रेट्रो लुकसाठी दिग्दर्शक अनुराग आणि डिझायनर निहारिका खानने विशेष मेहनत घेतली. त्यात ती १४0 ड्रेसेसमध्ये दिसणार आहे. ‘बॉम्बे वेलवेट’ २८ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.