अनुष्काचे वजन 35 किलोंनी वाढले
By Admin | Updated: July 11, 2014 00:23 IST2014-07-11T00:23:52+5:302014-07-11T00:23:52+5:30
अभिनेत्री अनुष्का शर्माचे वजन अचानक 35 किलोंनी वाढले; पण तिचे हे रूप सर्वाच्याच पसंतीस उतरले.

अनुष्काचे वजन 35 किलोंनी वाढले
अभिनेत्री अनुष्का शर्माचे वजन अचानक 35 किलोंनी वाढले; पण तिचे हे रूप सर्वाच्याच पसंतीस उतरले. सडपातळ असलेल्या अनुष्काला अचानक वाढलेले वजन सांभाळणो जरा कठीणच जात होते. अनुष्काच्या शरीराचे वजन 35 किलोंनी वाढले नसून तिने तिच्या आगामी चित्रपटात परिधान केलेल्या एका ड्रेसचे वजन 35 किलो आहे. अनुष्का सध्या बाँबे वेल्वेट नावाच्या एका चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटात ती एका गायिकेच्या भूमिकेत असून चित्रपटात तिने दीडशेहून जास्त कपडे परिधान केले आहेत. त्यापैकी एक आहे तो 35 किलो वजनाचा गाऊन. हा गाऊन सांभाळणो अनुष्कासाठी कठीण होते. गाऊन सांभाळण्यासाठी दोन सहायक नेहमीच तिच्यासोबत राहत असत.