अंकिता लोखंडेचा व्हिडीओ झाला व्हायरल, मराठमोळ्या आउटफिटमध्ये दिसली फोटोशूट करताना
By तेजल गावडे | Updated: October 19, 2020 14:14 IST2020-10-19T14:09:45+5:302020-10-19T14:14:25+5:30
अभिनेत्री अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे आणि युजर्स तिच्या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत.

अंकिता लोखंडेचा व्हिडीओ झाला व्हायरल, मराठमोळ्या आउटफिटमध्ये दिसली फोटोशूट करताना
अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांत सिंग राजपूतच्या निधनापासून सातत्याने चर्चेत येते आहे. सुशांतच्या निधनाला आता चार महिन्यांहून जास्त काळ उलटला आहे पण, अद्याप या प्रकरणी सीबीआयचा तपास संपलेला नाही. सुशांतच्या निधनाचे वृत्त ऐकून अंकिता कोलमडून गेली होती. त्यातून बाहेर पडण्याचा ती प्रयत्न करते आहे. नुकतेच तिने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती मराठमोळ्या आउटफिटमध्ये दिसते आहे.
अंकिता लोखंडेने एक व्हिडीओ आणि फोटो तिच्या फोटोशूट दरम्यानचे आहे. या व्हिडीओत अंकिता लोखंडे हिने हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली दिसते आहे. यावेळी ती मराठमोळ्या अंदाजात दिसते आहे. अंकिताने हिरव्या रंगाच्या साडीत व्हिडीओ आणि फोटो शेअर करत लिहिले की, मराठमोळं प्रेम, दागिने, मराठमोळे पदार्थ, मराठमोळी वधू. अंकिता लोखंडेच्या या फोटो व व्हिडीओवर चाहते खूप कमेंट्स करत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत.
सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपवला आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर या प्रकरणात एनसीबीदेखील सहभागी झाली आहे.