'सैयारा'साठी अनीत पड्डाला नव्हती पहिली पसंती, टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीची झालेली निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:05 IST2025-08-13T15:05:14+5:302025-08-13T15:05:43+5:30
Saiyaara Movie : 'सैयारा' या चित्रपटाने आपल्या यशाने सर्वांना चकित केले आहे. या रोमँटिक थ्रिलर चित्रपटातून अभिनेत्री अनीत पड्डा हिलाही खूप लोकप्रियता मिळाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, अनीत ही चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती आणि 'सैयारा' चित्रपटाची ऑफर एका टीव्ही अभिनेत्रीला देण्यात आली होती.

'सैयारा'साठी अनीत पड्डाला नव्हती पहिली पसंती, टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीची झालेली निवड
'सैयारा' (Saiyaara Movie) या चित्रपटाने आपल्या यशाने सर्वांना चकित केले आहे. या रोमँटिक थ्रिलर चित्रपटातून अभिनेत्री अनीत पड्डा (Aneet Padda) हिलाही खूप लोकप्रियता मिळाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, अनीत ही चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती आणि 'सैयारा' चित्रपटाची ऑफर एका टीव्ही अभिनेत्रीला देण्यात आली होती.
दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या रोमँटिक चित्रपट 'सैयारा'ने त्याच्या अद्भुत कथेने आणि गाण्यांनी सर्वांचे मन जिंकले आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. विशेषतः वाणी बत्राच्या भूमिकेत अनीतने अमिट छाप सोडली आहे. पण 'सैयारा'साठी अनीत पड्डा निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. असे वृत्त आहे की, तिच्या आधी हा चित्रपट एका टीव्ही अभिनेत्रीला ऑफर करण्यात आला होता, जी सलमान खानच्या रिएलिटी शो 'बिग बॉस'मध्येही दिसली आहे.
'सैयारा' हा चित्रपट १८ जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि आतापर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनीही त्यांच्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकले आहे. टेली चक्करच्या रिपोर्ट्सनुसार, असं सांगितलं जात आहे की अनीतची निवड आधी सैयारासाठी झाली नव्हती. तिच्या आधी हा चित्रपट टीव्ही अभिनेत्री ईशा मालवीयाला ऑफर करण्यात आला होता. हो, ही तीच ईशा आहे, जी सलमान खानच्या रिएलिटी शो बिग बॉस १७ मध्ये दिसली होती. याशिवाय, अभिनेत्री म्हणून ती उडरियांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांचा भाग राहिली आहे. मात्र, ईशा मालवीय काही कारणास्तव सैयाराची वाणी बत्रा बनू शकली नाही आणि नंतर ही भूमिका अनीत पड्डाकडे गेली. यानंतर जे घडले त्याचे सर्वजण साक्षीदार आहेत. कारण सैयाराच्या यशाने अनीतच्या अभिनय कारकिर्दीला चारचाँद लावले आहेत. या चित्रपटामुळे ती आता राष्ट्रीय क्रश बनली आहे आणि असे मानले जाते की अनीत पड्डा बॉलिवूडची पुढची सुपरस्टार देखील बनू शकते.
सैयाराने रचला इतिहास
सैयाराने रिलीजच्या २५ दिवसांत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३२० कोटींहून अधिक कमाई केली आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. यासोबतच, सैयाराने आपल्या कमाईने इतिहास रचला आहे आणि पदार्पणासाठी सर्वाधिक व्यवसाय करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.