अमृताची स्वप्नपूर्ती!
By Admin | Updated: May 7, 2015 22:40 IST2015-05-07T22:40:49+5:302015-05-07T22:40:49+5:30
अभिनेता रणबीर कपूरची प्रत्यक्षात भेट झाल्याने स्वप्न पूर्ण झाले, असे अभिनेत्री अमृता खानविलकरने म्हटले आहे. रिअॅलिटी शोच्या निमित्ताने

अमृताची स्वप्नपूर्ती!
अभिनेता रणबीर कपूरची प्रत्यक्षात भेट झाल्याने स्वप्न पूर्ण झाले, असे अभिनेत्री अमृता खानविलकरने म्हटले आहे. रिअॅलिटी शोच्या निमित्ताने रणबीरने ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनुष्का शर्मासह उपस्थिती लावली. या वेळी अमृता खानविलकर आणि रणबीर कपूरची भेट झाली. मी खूप खूश आहे. रणबीरला भेटणे हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. त्याच्यासाठी परफॉर्म करणे आणि त्याच्याकडून कौतुक मिळवणे हे त्याहूनही जास्त महत्त्वाचे आहे. हा क्षण मी आयुष्यभर मनात साठवून ठेवणार आहे, असे अमृता म्हणाली.