‘शक्ती’च्या रिमेकला अमिताभचा विरोध
By Admin | Updated: December 16, 2014 00:35 IST2014-12-16T00:35:52+5:302014-12-16T00:35:52+5:30
गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक बनविण्याचा ट्रेंड सध्या बॉलीवूडमध्ये चांगलाच रुळला आहे. महानायक अमिताभ बच्चनचे चित्रपटही त्यास अपवाद नाहीत.

‘शक्ती’च्या रिमेकला अमिताभचा विरोध
गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक बनविण्याचा ट्रेंड सध्या बॉलीवूडमध्ये चांगलाच रुळला आहे. महानायक अमिताभ बच्चनचे चित्रपटही त्यास अपवाद नाहीत. अमिताभच्या ‘डॉन’, ‘अग्निपथ’ आणि ‘जंजीर’ या चित्रपटांचे रिमेक बनविण्यात आले आहेत. ‘शक्ती’ या आपल्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक बनवू नये, असे मात्र ‘बिग बी’ला वाटते. ‘शक्ती’ हा सर्वार्थाने खास चित्रपट आहे. या चित्रपटाचा रिमेक बनवू नये, असे माझे प्रांजळ मत असल्याचे अमिताभने सांगितले. दिलीपकुमारसारख्या अभिनय सम्राटासोबत काम करण्याची संधी मला या चित्रपटातून मिळाली होती. दिलीपकुमार आणि माझी भूमिका साकारण्यासाठी सध्याच्या काळात कोण सक्षम आहे, या चर्चेत मी पडू इच्छित नाही, असेही अमिताभने स्पष्ट केले.