अमिताभ यांनी ट्विटरवरुन मांडलं फेसबूकचं दुखणं

By Admin | Updated: July 3, 2017 15:50 IST2017-07-03T15:48:29+5:302017-07-03T15:50:13+5:30

बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन फेसबूकमुळे त्रस्त असून आपलं हे गा-हाणं मांडण्यासाठी त्यांना ट्विटरची मदत घ्यावी लागली आहे

Amitabh had a Facebook link from Twitter | अमिताभ यांनी ट्विटरवरुन मांडलं फेसबूकचं दुखणं

अमिताभ यांनी ट्विटरवरुन मांडलं फेसबूकचं दुखणं

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन फेसबूकमुळे त्रस्त असून आपलं हे गा-हाणं मांडण्यासाठी त्यांना ट्विटरची मदत घ्यावी लागली होती. फेसबूक अकाऊंटमधील सर्व फिचर्स आपल्याला वापरासाठी मिळत नसल्याची तक्रार अमिताभ बच्चन यांनी केली होती. अमिताभ बच्चन यांनी सांगितलं होतं की, "मला फेसबूकवर आपलं म्हणणं मांडायचं आहे, मात्र माझं पेज पुर्णपणे ओपन होत नसल्याने मी ते करु शकत नाही आहे". विशेष म्हणजे फेसबूकची तक्रार करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना ट्विटरची मदत घ्यावी लागली. याबद्दलही अमिताभ बच्चन यांनी खेद व्यक्त केला. फेसबूकने दखल घेत अमिताभ बच्चन यांची समस्या सोडवली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत आता फेसबूक पेज ओपन होत असल्याचं सांगितलं आहे.  
 
अमिताभ बच्चन यांनी रविवारी ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, ‘अरे यार एफबी तू पुर्णपणे ओपन का होत नाहीस, मला माझ्या काही गोष्टी सांगायच्या आहेत". यासोबतच अमिताभ बच्चन यांनी आपला एक फोटो पोस्ट केला होता. फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांनी आपण उपहासात्मकपणे प्रश्न विचारत असल्याचं दाखवलं होतं. हा त्यांच्या एखाद्या आगामी चित्रपटातील फोटो असण्याची शक्यता आहे. 
 
गेल्या आठवड्यातही अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून तक्रार केली होती. "हॅलो फेसबूक, जागे व्हा.....माझं पेज पुर्णपणे ओपन नाही होत आहे...गेल्या कित्येक दिवसांपासून असंच होत आहे. तक्रार करण्यासाठी मला हे माध्यम निवडावं लागलं आहे". 
 

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून आपल्या आयुष्यातील अनेक घडामोडी, प्रसंग अपडेट करत असतात. सध्या ते "ठग्स ऑफ हिंदुस्तान" चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत आमीर खान मुख्य भुमिकेत आहे. आमीर खान आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोबतच अमिताभ लवकरच "कोन बनेगा करोडपती"मध्ये दिसणार आहेत. 
 
फेसबूकवर अमिताभ बच्चन यांनी 2.6 कोटी तर ट्विटरवर 2.7 कोटी फॉलोअर्स आहेत. 
 

Web Title: Amitabh had a Facebook link from Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.