Amitabh bachchan : अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका, 'माझ्या प्रतिमेचा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 01:31 PM2022-11-25T13:31:05+5:302022-11-25T13:33:17+5:30
महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खासगी अधिकाराच्या संरक्षणासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खासगी अधिकाराच्या संरक्षणासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. तर त्यांच्यातर्फे हरीश साळवे बाजू मांडणार आहेत.
अमिताभ बच्चन हे अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आवाजाची जादू तर सर्वांनाच माहित आहे. समाजात त्यांचे नाव आहे, प्रतिमा आहे. त्याचा गैरवापर कुठेही होऊ नये यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपला आवाज, नाव आणि प्रतिमा यांना संरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे.
बिग बी यांचा आवाज अनेक ठिकाणी वापरला जातो. त्यांचा अभिनय तर दमदार आहेच पण त्यांच्या आवाजाचेही अनेक जण चाहते आहेत. मात्र त्यांच्या परवानगी शिवाय अनेक ठिकाणी त्यांचा आवाज वापरला जातो. यापुढे असे होऊ नये म्हणून त्यांनी न्यायालयात संरक्षणाची मागणी केली आहे. न्यायमुर्ती नवीन चावला यांच्या खंडपिठासमोर सुनावणी होणार आहे.
सध्या अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपती च्या शुटिंग मध्ये व्यस्त आहेत. नुकताच त्यांचा ऊंचाई हा सिनेमा आला होता ज्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.