सभ्यतेच्या सर्व सीमा पार केल्या होत्या, पत्नी शिवानीने दीपक तिजोरीला सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2017 05:10 PM2017-04-04T17:10:28+5:302017-04-04T17:10:28+5:30

सुरुवातीपासून प्रसारमाध्यमांपासून दूर राहिलेल्या शिवानीने अखेर मौन सोडलं असून दीपक तिजोरीला खडे बोल सुनावले आहेत

All the limits of civilization were passed, and the wife Shivani told Deepak Tijori | सभ्यतेच्या सर्व सीमा पार केल्या होत्या, पत्नी शिवानीने दीपक तिजोरीला सुनावले

सभ्यतेच्या सर्व सीमा पार केल्या होत्या, पत्नी शिवानीने दीपक तिजोरीला सुनावले

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - 90 च्या दशकात "दिल", "सडक", "जो जिता वही सिकंदर" आणि "आशिकी" चित्रपटांमधून प्रसिद्धीस आलेला अभिनेता दीपक तिजोरी सध्या आपल्या वैवाहिक आयुष्यातील वादामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी दीपक तिजोरीला पत्नी शिवानीने घराबाहेर हाकलून काढलं होतं. यानंतर घटस्फोट आणि पोटगीसाठी तिने न्यायालयात अर्ज केला आहे. याप्रकरणी सुरुवातीपासून प्रसारमाध्यमांपासून दूर राहिलेल्या शिवानीने अखेर मौन सोडलं असून दीपक तिजोरीला खडे बोल सुनावले आहेत. 
 
(बायको लग्नाची आहे पण कायद्याची नाही, दीपक तिजोरीला धक्का)
 
फॅशन डिझायनर असलेल्या शिवानीने सांगितलं आहे की, "दीपक तिजोरी गेल्या 22 वर्षांपासून माझा पती असून आम्हाला एक मुलगीदेखील आहे. आमच्यात अनेकदा भांडणं झाली आहेत, मात्र यावेळी त्याने सर्व सीमा पार केल्या. त्याने सभ्यता, नैतिकता, संवेदनशीलता, समंजसपणाच्या आणि सर्वात महत्वाच्या कायद्याच्याही सर्व सीमा पार केल्या होत्या".
 
"आमचं प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असून याप्रकरणी काहाही न बोलण्याचा मी निर्णय घेतला होता. एक जबाबदार पत्नीच्या नात्याने माझ्याकडे काहाही लपवण्यासारखं नाही. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने निर्णय घेतला पाहिजे. ख-याचा विजय होईल असा विश्वास आहे", असंही शिवानी बोलल्या आहेत. 
 
दीपकचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने शिवानीने दीपक तिजोरीला घराबाहेर काढल्याची माहिती आहे. तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मित्रांसोबत राहत आहे. 
 
दीपक आपल्या पत्नीसोबत गोरेगावला 4 बीएचकेच्या घरात राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांच्या नात्यात मतभेदांमुळे तणावाचे वातावरण होते. पत्नी घरात घेत नसल्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी दिपक वकिलाकडे गेल्यावर त्याच्यासमोर धक्कादायक गोष्ट आली आहे.
 
कायद्याने त्याचे आणि शिवानीचे लग्नच झालेले नाही. दीपकसोबत लग्न करण्याआधी शिवानीचे लग्न झालेले होते आणि तिने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट न देताच दीपकसोबत लग्न केले होते. त्यामुळे हे लग्न कायद्याने वैध ठरत नाही असे वकिलाचे म्हणणे आहे. या दोघांना 21 वर्षांची मुलगी देखील आहे. 
 
शिवानी ही एक फॅशन डिझायनर असून तिने पोटगीसाठी मागणी केली आहे. तिचा आणि त्यांच्या मुलीचा खर्च ती भागवू शकत नाही असे तिचे म्हणणे आहे. वांद्रेतील कोर्टात सध्या ही केस सुरू आहे. याविषयी दिपकने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 
 

Web Title: All the limits of civilization were passed, and the wife Shivani told Deepak Tijori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.