आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचं ब्रेकअप?
By Admin | Updated: September 21, 2016 13:45 IST2016-09-21T12:02:27+5:302016-09-21T13:45:57+5:30
अभिनेत्री आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी स्टूडंट ऑफ द इयर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासूनच बॉलिवूडमधील 'क्यूट कपल' म्हणून त्यांची ओळख

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचं ब्रेकअप?
>ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.21- अभिनेत्री आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 'स्टूडंट ऑफ द इअर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासूनच बॉलिवूडमधील 'क्यूट कपल' म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र लवकरच दोघं वेगळं होणार असल्याचं वृत्त आहे.
दोघांनी विचार करून ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघांना आपल्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे, त्यामुळे स्वतःच्या करिअरचे नुकसान होईल अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. म्हणूनच सध्या आलिया आणि सिद्धार्थ एकमेकांपासून दूर राहत आहेत.
सिद्धार्थचा नुकताच आलेला चित्रपट 'बार बार देखो' हा चांगलाच आपटला त्यानंतर सिद्धार्थने करिअरवरच लक्ष देण्याचं ठरवलं असं बोललं जात आहे. आलिया सध्या 'डिअर जिंदगी' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया'मध्ये व्यस्त आहे, तिने सुद्धा आपलं लक्ष करिअरवरच केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.