आलिया पुन्हा बनली गायिका
By Admin | Updated: June 29, 2014 23:46 IST2014-06-29T23:46:16+5:302014-06-29T23:46:16+5:30
अभिनयाच्या क्षेत्रत आलिया भट्टला चांगले यश मिळत आहे; परंतु अभिनयासोबतच ती आणखी एका क्षेत्रत नशीब अजमावीत आहे.

आलिया पुन्हा बनली गायिका
>अभिनयाच्या क्षेत्रत आलिया भट्टला चांगले यश मिळत आहे; परंतु अभिनयासोबतच ती आणखी एका क्षेत्रत नशीब अजमावीत आहे. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या आगामी चित्रपटात गायिका बनण्यासाठी तिने पुन्हा एकदा होकार दिला आहे. ‘हायवे’ या चित्रपटात आलियाने यापूर्वी आपले गायन कौशल्य सिद्ध केले होते. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातील आलियाच्या आवाजातील गाणो पुढील आठवडय़ात रिलीज केले जाईल. अभिनय आणि गायन या क्षेत्रत एकाच वेळी यश मिळविण्याचा विक्रम यापूर्वी सलमा आगा हिने केला होता. आलियाला तिच्या प्रमाणोच यश मिळेल काय, हे आगामी काळात दिसून येईल.