अक्षयने विकत घेतला कबड्डी संघ
By Admin | Updated: June 19, 2014 10:49 IST2014-06-19T10:49:28+5:302014-06-19T10:49:48+5:30
अक्षय कुमारला ‘खिलाडी कुमार’ म्हटले जाते. अक्षयने नुकताच एक कबड्डी संघ खरेदी केला असल्याची बातमी आहे.

अक्षयने विकत घेतला कबड्डी संघ
>अक्षय कुमारला ‘खिलाडी कुमार’ म्हटले जाते. चित्रपटातील हा खिलाडी खर्या आयुष्यात क्रीडाप्रेमी आहे. मार्शल आर्टस् आणि इतर खेळांबाबत त्याचे असलेले प्रेम जगापासून लपलेले नाही. अक्षयने नुकताच एक कबड्डी संघ खरेदी केला असल्याची बातमी आहे. ही टीम वर्ल्ड कबड्डी लीगमध्ये खेळणार आहे. हा पंजाबचा संघ आहे. द वर्ल्ड कबड्डी लीग स्पर्धा ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान आयोजित केल्या जाणार आहेत. त्याने टीम खरेदी केल्याने कबड्डी लीगला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. वर्ल्ड कबड्डी लीगमध्ये खेळणार्या जयपूर संघाचा मालक अभिषेक बच्चन आहे.