​ ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’च्या प्रमोशनपासून का दूर पळतेय अक्षरा हासन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 10:25 IST2017-03-29T04:55:15+5:302017-03-29T10:25:15+5:30

कमल हासनची लाडकी लेक अक्षरा हासन हिचा दुसरा सिनेमा ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. ...

Akashara Hassan is away from the promotion of 'Lali Diwani' | ​ ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’च्या प्रमोशनपासून का दूर पळतेय अक्षरा हासन?

​ ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’च्या प्रमोशनपासून का दूर पळतेय अक्षरा हासन?

ल हासनची लाडकी लेक अक्षरा हासन हिचा दुसरा सिनेमा ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. पण अक्षरा कुठेयं?? कारण, प्रमोशनमध्ये अक्षरा कुठेच नाहीय. अलीकडे या चित्रपटाचे म्युझिक लॉन्च झाले. पण या इव्हेंटमध्ये अक्षरा दिसली नाही. शेवटी अक्षरा गेली कुठे? याच प्रश्नाचा माग घेतला असता आमच्या हाती एक ‘हॉट’ बातमी लागली. होय, अक्षराला म्हणे ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’च्या प्रमोशनमध्ये आता कुठलाही इंटरेस्ट राहिलेला नाहीय. फिल्म प्रमोशनमधून तिने अचानक काढता पाय घेतला आहे. चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चदरम्यान अक्षराच्या काकांचे निधन झाले होते. कदाचित यामुळे अक्षरा आली नसावी, असे दिग्दर्शक मनीष हरिशंकर यांना वाटले. पण यानंतरच्या प्रमोशनला येण्यासही अक्षरा आता टाळाटाळ करू लागलीय. आता याचे कारण काय? तर विवान शहा.



होय, विवान शहा यात मुख्य भूमिकेत आहे. कधीकाळी अक्षरा व विवान एकमेकांच्या खूप जवळ होते. पण आता त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे कळतेय. अर्थात अक्षराने शूटींगवर याचा कुठलाच परिणाम होऊ दिला नाही. प्रारंभीच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये ती सहभागीही झाली. पण यानंतर अचानक ती प्रमोशनपासून दूर पळू लागली. तिच्या अशा वागण्यामागे तिचा कथित बॉयफ्रेन्ड असल्याचे कळतेय. अक्षरा व विवानने एकत्र प्रमोशन करू नये, असे तिच्या बॉयफ्रेन्डला वाटतेय. यामुळेच अक्षरा प्रमोशनला ‘ना’ म्हणू लागलीय.

ALSO READ : प्रीती, विद्या, सुश्मितानंतर अक्षरा हासन ‘गर्भवती’!

हरिशंकर यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अक्षरा प्रमोशन टाळू लागलीय. त्याचे कारण विवानसोबतचे नाते आहे की काय, मला माहित नाही. पण अक्षरा लीड अ‍ॅक्ट्रेस आहे. चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी तिच्यावर आहे. अशात ती जबाबदारी टाळत असेल तर हे दुर्दैवी आहे. किमान तिने माझा फोन पिक केला तरी नेमके कारण मला समजू शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Akashara Hassan is away from the promotion of 'Lali Diwani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.