अक्की घेतोय अरेबिकचे धडे
By Admin | Updated: February 28, 2015 23:44 IST2015-02-28T23:44:33+5:302015-02-28T23:44:33+5:30
बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार आगामी चित्रपटासाठी अरेबिक भाषेचे धडे गिरवतोय.

अक्की घेतोय अरेबिकचे धडे
बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार आगामी चित्रपटासाठी अरेबिक भाषेचे धडे गिरवतोय. बॉलीवूडच्या ‘परफेक्शनिस्ट’च्या पावलावर पाऊल ठेवून पात्राचे बारकावे जाणून घेण्यासाठी गेले कित्येक महिने अक्षय हे प्रशिक्षण घेतोय. या वर्षीच्या अखेरीस अक्कीचा ‘एअरलिफ्ट’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.