अजयला मराठी सिनेमाची भुरळ !

By Admin | Updated: August 19, 2014 23:43 IST2014-08-19T23:43:09+5:302014-08-19T23:43:09+5:30

अभिनेता अजय देवगणला मराठी सिनेमाची अशी काही मोहिनी पडलीय की, त्याने चक्क विटी-दांडू नामक सिनेमाची झोकात निर्मिती केलीय़

Ajale Marathi cinema! | अजयला मराठी सिनेमाची भुरळ !

अजयला मराठी सिनेमाची भुरळ !

पूजा सामंत - मुंबई
आजचा काळ ख:या अर्थाने मराठी सिनेमासाठी प्रचंड घोडदौडीचा आह़े जितका उत्कर्षाचा तितकाच आव्हानांचा आह़े सध्या सिंघम रिटर्न्‍समुळे चर्चेत असलेल्या अभिनेता अजय देवगणला मराठी सिनेमाची अशी काही मोहिनी पडलीय की, त्याने चक्क विटी-दांडू नामक सिनेमाची झोकात निर्मिती केलीय़ विटी-दांडूची कथा-पटकथा आणि दिग्दर्शन गंगाधर टिपरे मालिकेत मराठमोळ्या रसिकांचा लाडका बनलेल्या शि:या ऊर्फ विकास कदमचे असेल.
विटी-दांडूसंदर्भात बोलताना अजय देवगण म्हणाला, मी मुंबईत लहानाचा मोठा झालोय़ माङो अनेक मित्र मराठी आहेत़ मराठी भाषेचा आपोआप मला लळा लागत गेला़ त्यातूनच विकास कदम अतिशय मेहनती-हरहुन्नरी अभिनेता-लेखक युवक, ज्याला मी अनेक वर्षे ओळखतोय, त्याने जेव्हा ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेल्या विटी-दांडूचे कथानक मला ऐकवले, त्या क्षणीच खूणगाठ बांधली की, हा विटी-दांडू खेळलाच पाहिज़े म्हणूनच मी विटी-दांडू सिनेमासाठी सर्वतोपरी साहाय्य केले आणि माङया सिंघम रिटर्न्‍ससोबतच विटी-दांडूचे ट्रेलर लाँच केले.
आजोबा व नातू यांच्या भावजीवनाभोवती फिरणा:या विटी-दांडूचे कथानक स्वातंत्र्यपूर्व काळात घडते, म्हणूनच ब्रिटिश राजवटीतील भारत व स्वतंत्र झाल्यानंतरचा भारत अशा कालखंडात कथा पुढे जात़े देशभक्ती गीत, लावणी, भारूड, खेळगीत अशा विविध मूड्सची गाणी रसिकांच्या मनात रु ंजी घालतील, असा विश्वास अजय देवगण यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे विटी-दांडू या चित्रपटात तगडय़ा कलाकारांची फौज आह़े दिलीप प्रभावळकर, रवींद्र मंकणी, यतीन कार्येकर, अशोक समर्थ, ठाकूर, विकास कदम, गोहर खान अशी अनेक नावे यात सामील आहेत. लेखक अभिराम भडकमकर यांचे खुमासदार संवादलेखनही अजय देवगणच्या पसंतीस उतरलेय. विटी-दांडूबाबत अजय स्वत: जातीने लक्ष घालतोय. दीपाली विचारे, सुभाष नकाशे, राहुल ठोंबरेचे नृत्य 
दिग्दर्शन सिनेमाला लाभलेय. विटी-दांडूच्या निर्मात्या आहेत लीना देवरे.
मराठी सिनेमाच्या निर्मितीत उडी घेतलेला अजय देवगण नजीकच्या काळात मराठी सिनेमात अभिनयही करेल, अशी शक्यता नाकारता येत नाही़

 

Web Title: Ajale Marathi cinema!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.