ऐश्वर्याने केले विक्रम फडणीस यांच्या ‘हृदयांतर’चे संगीत प्रकाशन!

By Admin | Updated: June 16, 2017 02:57 IST2017-06-16T02:57:00+5:302017-06-16T02:57:00+5:30

विक्रम फडणीस आपल्या आगामी चित्रपट ‘हृदयांतर’द्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच ट्रेलर लाँच झाला. ट्रेलरला काही काळातच

Aishwarya made the music publication of the heart of Vikram Phadnis! | ऐश्वर्याने केले विक्रम फडणीस यांच्या ‘हृदयांतर’चे संगीत प्रकाशन!

ऐश्वर्याने केले विक्रम फडणीस यांच्या ‘हृदयांतर’चे संगीत प्रकाशन!

विक्रम फडणीस आपल्या आगामी चित्रपट ‘हृदयांतर’द्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच ट्रेलर लाँच झाला. ट्रेलरला काही काळातच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि सर्व स्तरातून प्रशंसा ही मिळाली. सुपरस्टार हृतिक रोशनने हृदयांतरचा ट्रेलर लाँच केल्यावर आता प्रतिभावान अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने या चित्रपटाचे संगीत प्रकाशन केले आहे.
विक्रमने जेव्हा ऐश्वर्याला चित्रपटाच्या संगीताविषयी सांगितले. तेव्हा ऐश्वर्याने क्षणभरही विचार न करता या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला सहभागी होण्याची तयारी दाखवली. फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची गेली खूप वर्षे जुनी मैत्री आहे. त्यांनी काही प्रोजेक्टसवर एकत्र कामही केले आहे. हृदयांतरच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला ऐश्वर्या राय बच्चन म्हणाली, ‘हृदयांतर आयुष्य साजरं करण्याचा प्रवास आहे. पण त्याचवेळी मला असं वाटतं, हृदयांतर हा एक सुंदर, संवेदनशील आणि भावनिक चित्रपट आहे. या संगीत अनावरण सोहळ्याचा मी हिस्सा होऊ शकले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. निर्माता-दिग्दर्शक विक्रम फडणीस म्हणतात, ‘चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याआधीपासूनच संगीत या चित्रपटाचा अविभाज्य भाग होता. चित्रपटाची गाणी आणि पार्श्वसंगीत चित्रपटाच्या कथानकाला योग्य रीतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. मी आणि ऐश्वर्याने गेली काही वर्षे एकत्र काम केले आहे. ती माझ्या चित्रपट कारकिर्दीचा एक अविभाज्य भाग आहे. काही नाती प्रोफेशनपर्यंत मर्यादित नसतात. ऐश्वर्याचा मी खूप आदर करतो. आमचे ऋणानुबंध खूप घट्ट आहेत. तिच्या हस्ते संगीत अनावरण होणे, हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि टोएब एन्टरटेन्मेट निर्मित हृदयांतर चित्रपट ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: Aishwarya made the music publication of the heart of Vikram Phadnis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.