मृण्मयी, स्वानंदीनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, मेहंदी सेरेमनीचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 12:46 PM2023-12-26T12:46:01+5:302023-12-26T12:46:34+5:30

नुकतेच स्वानंदी बेर्डे-आशिष कुलकर्णी, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर आणि मानसी घाटे-आकाश पंडीत यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्न करते आहे.

After Mrinmayi, Swanandi, another Marathmoli actress will get married, Mehendi ceremony photos surfaced | मृण्मयी, स्वानंदीनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, मेहंदी सेरेमनीचे फोटो आले समोर

मृण्मयी, स्वानंदीनंतर आणखी एक मराठमोळी अभिनेत्री अडकणार लग्नबेडीत, मेहंदी सेरेमनीचे फोटो आले समोर

सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे. एका पाठोपाठ अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. नुकतेच स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर आणि मानसी घाटे-आकाश पंडीत यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्न करते आहे. ही अभिनेत्री म्हणजे तुला पाहते रे फेम सोनल पवार (Sonal Pawar) . ती २८ डिसेंबरला विवाहबद्ध होणार आहे. सध्या तिच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो समोर आले आहेत.

अभिनेत्री सोनल पवार २८ डिसेंबरला समीर पालुष्टेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. नोव्हेंबरमध्ये या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना खुशखबर दिली होती. दरम्यान आता तिच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहेत. नुकतीच तिची मेहंदी सेरेमनी पार पडली. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.


सोनलचा होणार नवरा कोण आहे?
समीर पालुष्टे हा बिझनेसमन आहे. स्पार्कल्स मीडियाचा समीर फाऊंडर आणि सीईओ आहे. याशिवाय समीर डिजिटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणून काम करतो. त्याला भारत सरकारच्या निवडणुक आयोगाकडून पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. 

वर्कफ्रंटबद्दल...
सोनल पवारने तुला पाहते रे मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत तिने रुपालीची भूमिका केली होती. याशिवाय तिने घाडगे अँड सून या मालिकेतही काम केले आहे. सध्या ती रमा - राघव मालिकेत झळकत आहे. यात तिने अश्विनीची भूमिका बजावली आहे. 


 

Web Title: After Mrinmayi, Swanandi, another Marathmoli actress will get married, Mehendi ceremony photos surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.