दीपिकानंतर आता सनीचाही लुंगी डांस
By Admin | Updated: July 17, 2014 03:41 IST2014-07-17T03:41:53+5:302014-07-17T03:41:53+5:30
बॉलीवूडमध्ये आता बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी सनी लियोन एका तेलगू चित्रपटात लुंगी डांस करताना दिसणार आहे. सनी ‘करंट थीगा’ या चित्रपटातून तेलगू चित्रपटात एंट्री करीत आहे.

दीपिकानंतर आता सनीचाही लुंगी डांस
बॉलीवूडमध्ये आता बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी सनी लियोन एका तेलगू चित्रपटात लुंगी डांस करताना दिसणार आहे. सनी ‘करंट थीगा’ या चित्रपटातून तेलगू चित्रपटात एंट्री करीत आहे. सनी या चित्रपटात एका बोल्ड टीचरच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटात ती एका गाण्यात लुंगी डांस करताना दिसणार आहे. या गाण्याचे शूटिंग हैदराबादेत झाले आहे. सनीने या गाण्यात लुंगीसोबत स्पोर्टस् शूज घातले आहेत. मागील वर्षी रिलीज झालेल्या चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटात दीपिका पदुकोणने शाहरुखसोबत लुंगी डांस केला होता. हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. आता सनीच्या लुंगी डांसला काय प्रतिक्रिया मिळतात, ते चित्रपट रिलीज झाल्यावरच कळू शकेल.