11 वर्षानंतर प्रेक्षकांच्या लाडक्या "साराभाई"चं पुनरागमन

By Admin | Published: April 4, 2017 03:03 PM2017-04-04T15:03:03+5:302017-04-04T15:03:03+5:30

प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ तब्ब्ल 11 वर्षानंतर पुन्हा तुमच्या भेटीला

After 11 years, the audience of "Sarabhai" returned | 11 वर्षानंतर प्रेक्षकांच्या लाडक्या "साराभाई"चं पुनरागमन

11 वर्षानंतर प्रेक्षकांच्या लाडक्या "साराभाई"चं पुनरागमन

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - स्टार वन वाहिनीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ तब्ब्ल 11 वर्षानंतर पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे. मे महिन्यापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा या मालिकेचा आनंद घेता येणार आहे. टीव्हीवर मित्र आणि कुटुंबासोबत पाहताना निखळ मनोरंजन करणारी ही मालिका यावेळी वेब सीरिजच्या माध्यमातून येत आहे.  या मालिकेच्या  शूटिंगला पुन्हा सुरुवात झाली आहे. 
 
निर्माता - दिग्दर्शक जमनदास मजेठिया यांनी  फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साराभाई कुटुंबातील विविधांगी व्यक्तिरेखा आणि त्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांची पुन्हा ओळख करुन दिली. 2004मध्ये प्रसारित करण्यात आलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. प्रेक्षकांनी मालिकेला अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं होतं. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडलं होतं. मालिकेला इतका चांगला प्रतिसाद मिळत असतानादेखील अवघ्या 69 एपिसोड्सनंतर 10 मार्च 2006 ला मालिका बंद करण्यात आली होती. 
 
"मालिकेनंतर आम्ही सर्वजण आपापल्या इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त झालो होतो. पण गेल्या 10 वर्षीत मी कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमात गेलो की मला साराभाई पुन्हा कधी येणार हा प्रश्न हमखास विचारला जायचा. लोकांचं हे प्रेम आणि मागणी पाहता एका उत्तम आणि दर्जेदार स्क्रिप्टसह आम्ही पुन्हा एकदा परत येण्याचा निर्णय घेतला , अशी माहिती जमनदास मजेठिया यांनी दिली आहे. 
 
दिग्दर्शक जमनादास मजेठिया यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर सर्व कलाकारांचा फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करताना सोबतच साराभाईच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज असल्याचं म्हटलं होतं. ही गुड न्यूज म्हणजे मालिकेचा सिक्वेल असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार साराभाई पुन्हा एकदा आपल्या कुटुंबात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 
 

Web Title: After 11 years, the audience of "Sarabhai" returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.