अफवांना वैतागली परिनीती चोप्रा
By Admin | Updated: January 16, 2016 04:41 IST2016-01-16T04:41:54+5:302016-01-16T04:41:54+5:30
अ भिनेत्री परिनीती चोप्रा ही सध्या तिच्याविषयी सुरू असलेल्या अफवांना फारच त्रासली आहे. फराह खान दिग्दर्शित आगामी चित्रपटात ती काम करणार असल्याच्या अफवा

अफवांना वैतागली परिनीती चोप्रा
अ भिनेत्री परिनीती चोप्रा ही सध्या तिच्याविषयी सुरू असलेल्या अफवांना फारच त्रासली आहे. फराह खान दिग्दर्शित आगामी चित्रपटात ती काम करणार असल्याच्या अफवा सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीत सुरू आहेत. परिनीती सलमानसोबत सुल्तान चित्रपटात काम करणार आहे, अशी एक अफवा सुरू होती. प्रत्येक चित्रपटासोबत तिचे नाव जोडले जाते म्हणून ती फराह खान आणि सर्वांवरच नाराज आहे. ‘मी सध्या कुठल्याही चित्रपटासाठी शूटिंग करत नाही. प्रत्येक येणाऱ्या चित्रपटाविषयी मग सर्व जण विचार करतात
की, काय हाच तो चित्रपट आहे ज्यात परिनीती काम करणार आहे. मी या सगळ्या गोष्टींना फारच कंटाळले आहे. मला वाटतं की लोकांनी थांबावे आणि मी काही तरी न्यूज देण्याची वाट पाहावी.’