किशोरनं घटवलं वजन

By Admin | Updated: April 1, 2015 23:14 IST2015-04-01T23:14:31+5:302015-04-01T23:14:31+5:30

आपल्या कवितांनी आणि सशक्त अभिनयाने अभिनेता किशोर कदम यांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चांगली भूमिका असेल तर

Adolescent weight weight | किशोरनं घटवलं वजन

किशोरनं घटवलं वजन

आपल्या कवितांनी आणि सशक्त अभिनयाने अभिनेता किशोर कदम यांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चांगली भूमिका असेल तर त्यासाठी तितकीच मेहनत घेण्याची तयारीही त्याची असते. हेच किशोर कदमने 'गणवेश’ चित्रपटातही दाखवून दिलं आहे. गणवेशाचं महत्त्व विषद करणाऱ्या अतुल जगदाळे दिग्दर्शित 'गणवेश’ या चित्रपटात किशोर कदम प्रमुख भूमिकेत आहे. किशोरची शरीरयष्टी भारदस्त आहे. मात्र चित्रपटासाठी त्याला आपलं ८५ किलोच्या आसपास असलेलं वजन चक्क १३ किलोने कमी करावं लागलं. याविषयी किशोर म्हणाला की, मी सुरुवातीपासूनच डाएटिंगकडे बारकाईने लक्ष देत आलो आहे. मात्र एखाद्या भूमिकेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर वजन कमी करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. वजन कमी करणं भूमिकेची गरज असल्याने ते आव्हान २-३ महिन्यांत पेलायचं होतं. डाएटिशियन्सना अशक्य वाटणारी गोष्ट मात्र मला स्वत: डाएट करून शक्य करता आली, असंही किशोरने सांगितलं. किशोर चित्रपटात वीजभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराची भूमिका करत असून त्याच्याबरोबर मुक्ता बर्वे आणि स्मिता तांबे यांच्याही भूमिका आहेत. तर चित्रपटाची निर्मिती अतुल जगदाळेंची आहे.

Web Title: Adolescent weight weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.