अदिती बनणार चंद्रमुखी
By Admin | Updated: August 27, 2014 02:04 IST2014-08-27T02:04:29+5:302014-08-27T02:04:29+5:30
अ भिनेत्री अदिती राव हैदरी सुधीर मिश्रा यांची चंद्रमुखी बनण्याची शक्यता आहे. ‘देवदास’ या बंगाली पुस्तकावर आधारित एक चित्रपट ते बनवणार आहेत

अदिती बनणार चंद्रमुखी
अ भिनेत्री अदिती राव हैदरी सुधीर मिश्रा यांची चंद्रमुखी बनण्याची शक्यता आहे. ‘देवदास’ या बंगाली पुस्तकावर आधारित एक चित्रपट ते बनवणार आहेत. यात चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी त्यांनी अदितीला आॅफर दिल्याचे कळते. चित्रपटात राहुल भट्ट ‘देवदास’च्या भूमिकेत दिसेल. पारोच्या भूमिकेसाठी रिचा चढ्ढाला विचारणा झाली आहे. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा केलेली नाही पणस्टारकास्ट फायनल होताच, या चित्रपटाची घोषणा केली जाईल.