धोबीघाटावर अवतारात दिसली 'ही' अभिनेत्री....
By Admin | Updated: November 11, 2016 11:06 IST2016-11-11T11:06:26+5:302016-11-11T11:06:26+5:30
बॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री दीपिका पडूकोण नुकतीच एका वेगळ्या अवतारात धोबीघाट येथे चित्रीकरण करत होतील.

धोबीघाटावर अवतारात दिसली 'ही' अभिनेत्री....
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - बॉलिवूडची आघाडी अभिनेत्री दीपिका पडूकोण सध्या हॉलिवूडमधील पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. विन डिझेल या अभिनेत्यासोबत ' xxx द रिटर्न ऑफ झेन्डर केज’ या चित्रपटात ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार असून काही अॅक्शन सीनही परफॉर्म करणार आहे. मात्र नुकतीच मुंबईतील धोबाघाट येथे नॉन ग्लॅमरस रुपात दिसली. इटालियन दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या चित्रपटातसाठी दीपिका अशा अवतारात झळकली असून तिला ओळखणेही कठीण झाले होते.
तिची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली असून ती सावळा रंगात, एका ढगळ पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. ट्विटरवर हे फोटो पोस्ट झाल्यावर अनेकांना धक्का बसला आणि अवघ्या काही वेळातच दीपिकाचे ' या' अवतारातील फोटो सगलीकडे शेअर झाले. गेल्याच आठड्यात दीपिकाने धोबीघाट येथे तिच्या सिक्रेट प्रोजक्टसाठी चित्रीकरण केले. मिळालेल्या माहितीनुसार, इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांचा हा महत्वाकांक्षी चित्रपट असून दीपिका त्यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मुंबईसह दिल्ली, राजस्थान, काश्मिर आणि उत्तर प्रदेशातील काही भागांत चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. या वर्षाखेरीस वा २०१७च्या सुरूवातीपर्यंत हे चित्रीकरण पूर्ण होणार असल्याचे समजते. ‘चिल्ड्रन ऑफ हेवन’, ‘द कलर ऑफ पॅरॅडाइज’, ‘मुहम्मद’ यांसारख्या अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शन माजिदी यांनी केले.
Untagged- Deepika Padukone was seen shooting with Iranian filmmaker- Majid Majidi in Dhobi Ghat last week. #SecretProjectpic.twitter.com/tsp7todLVD— Deepika Addicts (@deepikaddicts) 10 November 2016
Deepika Padukone spotted in an unusual look in Mumbai, Dhobi Ghaat. pic.twitter.com/yUPkkONFv7— Deepika Addicts (@deepikaddicts) 9 November 2016