भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अभिनेत्री गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2017 06:20 IST2017-01-27T06:20:38+5:302017-01-27T06:20:38+5:30

मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये एक,दोन नव्हे तर तब्बल 6 भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अभिनेत्री गंभीर जखमी

Actress seriously injured in the attack by dogs | भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अभिनेत्री गंभीर जखमी

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अभिनेत्री गंभीर जखमी

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 -  एक,दोन नव्हे तर तब्बल 6 भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दाक्षिणात्य अभिनेत्री पारूल यादव गंभीर जखमी झाली आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये ही घटना घडली. पारूलला मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 
 
सोमवारी संध्याकाळी पारूल  मुंबईच्या जोगेश्वरी रोडवरील आपल्या इमारतीबाहेर स्वतःच्या पाळीव कुत्र्यासोबत फिरत होती. त्याचवेळी आजुबाजूला असलेल्या जवळपास 6 भटक्या कुत्र्यांनी तिच्या कुत्र्यावर हल्ला केला. आपल्या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना भटक्या कुत्र्यांनी पारूलवरही हल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.  तिच्या हातावर तसेच चेहरा आणि गळ्यावर जखमा झाल्या आहेत. 
बॉलिवूडचा सिमेना 'क्वीन'च्या कन्नड रिमेकमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तामिळ आणि मल्याळी सिमेमांमधून पारूलने करिअरची सुरूवात केली होती. किलिंग वीरप्पन, उप्पी2, वास्तु प्रकारा आणि बच्चन अशे अनेक हिट चित्रपट तिने केले आहेत.  

Web Title: Actress seriously injured in the attack by dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.