सिंगल असल्यामुळे अभिनेत्रीला काढले घराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 19:33 IST2017-05-16T19:26:54+5:302017-05-16T19:33:54+5:30

निधी अग्रवाल आणि टायगर सध्या मुन्ना मायकल या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. निधीने यापूर्वी साऊथच्या चित्रपटात काम केले आहे.

The actress removed the house because she was single | सिंगल असल्यामुळे अभिनेत्रीला काढले घराबाहेर

सिंगल असल्यामुळे अभिनेत्रीला काढले घराबाहेर

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - "हिरोपंती"द्वारे चित्रपटामध्ये पदार्पण करणारा जॅकी श्राफचा मुलगा टायगर सध्या चित्रपटमध्ये आपला जम बसवत आहे. "फ्लाइंग जट"नंतर तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. त्याच्या आगमी चित्रपटात निधी अग्रवाल हा नवा चेहरा बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. निधी अग्रवाल आणि टायगर सध्या मुन्ना मायकल या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. निधीने यापूर्वी साऊथच्या चित्रपटात काम केले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, निधी अग्रवालला वांद्रेच्या घरातून बाहेर काढले आहे. वांद्रेच्या एका सोसायटीमध्ये ती एकटी राहत होती. तिला घराबाहेर काढण्याचे कारण म्हणजे ती एकटी राहत होती. शिवाय ती सिनेमात काम करते, त्यामुळे तिला वांद्रे येथील घर सोडण्यास सोसायटीने भाग पाडल आहे.
मुंबईसारख्या शहरात घडलेल्या या घटनेने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. आपण सिंगल राहत असल्यामुळे सोसायटीने घर सोडण्यास भाग पाडलं, असं निधीने मिड डेशी बोलताना सांगितलं. यासंबंधीतच आणखी एक वृत्त म्हणजे मुंबईतील अनेक सोसायटींनी सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांना घर न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
दरम्यान केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण भारत आणि जगभरात अशा घटना घडतात. वैवाहिक स्थिती, जात, धर्म, स्त्री-पुरुष असा अनेक प्रकारे भेदभाव केला जातो. मुंबईत गेल्या काही दिवसात अशी उदाहरणं समोरही आली आहेत. मुंबईची अशा घटनांच्या बाबतीत जगभरात एक वेगळी ओळख आहे. मुंबईत कुणालाही भेदभावाचा सामना करावा लागत नाही. मात्र एका अभिनेत्रीला घर सोडायला लावल्यामुळे या प्रकाराची सर्वत्र चर्चा आहे.

Web Title: The actress removed the house because she was single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.