अभिनेत्री क्रांती रेडकरचा न्यायासाठी लढा
By Admin | Updated: September 6, 2014 02:47 IST2014-09-06T02:47:07+5:302014-09-06T02:47:07+5:30
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये अभिनेत्री क्रांती रेडकरचा सहभाग असल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दाखवले होते.

अभिनेत्री क्रांती रेडकरचा न्यायासाठी लढा
मुंबई : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये अभिनेत्री क्रांती रेडकरचा सहभाग असल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दाखवले होते. याप्रकरणी बोरिवली न्यायालयाने या वृत्तवाहिनीला समन्स बजावले आहेत.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात क्रांतीच्या सहभागाबद्दलचे वृत्त खासगी वाहिनीने दाखविल्यामुळे तिला आणि तिच्या पालकांना वर्षभर प्रचंड मानसिक त्रस सहन करावा लागला. क्रांतीने या वृत्तवाहिनीविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाची सुनावणी शुक्रवारी न्यायालयात झाली असता न्यायालयाने वृत्तवाहिनीला अब्रुनुकसानीसंदर्भात समन्स बजावले आहे. ज्यादिवशी मी कोकणमध्ये ‘काकण’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. त्यादिवशी श्रीसंतबरोबर मला हॉटेलमध्ये पकडल्याचे वृत्त वाहिनीने प्रसारित केले. याबाबत वाहिनीने माङयाशी संपर्क साधला नाही. त्या वेळी वृत्तवाहिनीने दुस:या व्यक्तीस क्रांती रेडकर समजल्याने ही मोठी चूक घडली होती. मात्र, या चुकीच्या वृत्ताच्या आधारे इतर माध्यमांनीही ही बातमी प्रसारित केल्याने माङो आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मानहानी, बदनामी, नैराश्य, पालकांचे खच्चीकरण या सगळ्यातून मी वर्षभर त्रस सहन करीत आहे. मला उपचारही घ्यावे लागले, असे क्रांतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
मी 15 वर्षापासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असून या एका घटनेमुळे माङो करिअर संपुष्टात आले. या प्रकरणात मला न्याय मिळावा म्हणून मी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचे, क्रांतीने सांगितले. चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांनी क्रांतीला पाठिंबा दर्शविला आहे. (प्रतिनिधी)