अभिनेता सनी देओलचा मुलगा "या" चित्रपटातून करणार पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 16:03 IST2017-05-22T17:25:15+5:302023-08-08T16:03:20+5:30

अभिनेता सनी देओलचा मुलगा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे

Actor Sunny Deol's son debut from "This" movie | अभिनेता सनी देओलचा मुलगा "या" चित्रपटातून करणार पदार्पण

अभिनेता सनी देओलचा मुलगा "या" चित्रपटातून करणार पदार्पण

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - देओल परिवाराची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता सनी देओलचा मुलगा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच “पल पल दिल के पास” या चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सनी देओलने टि्वट करत ही माहिती दिली आहे.

करणबरोबरचा सनीनं स्वतःचा फोटोही शेअर केला आहे. मुलगा करण मोठा झाल्याचं सनी देओलनं कौतुक करत सांगितलं आहे. सनीसारखा हुबेहूब असलेला करण दिसायला रेखीव असून तोही आजोबा आणि वडिलांप्रमाणे बॉलिवूडवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सनीच्या चाहत्यांनी मनापासून करणला शुभेच्छा दिल्या आहेत.

करण देओलचा स्टारर चित्रपट "पल पल दिल के पास" देओल परिवाराच्या प्रोडक्शन हाऊस आणि झी स्टुडिओसोबत मिळून बनवतो आहे. सनी देओलनं गदर एक प्रेम कथा या चित्रपटानंतर पहिल्यांदाच कोणत्या तरी चित्रपटासाठी स्टुडिओसोबत हातमिळवणी केली आहे. चित्रपटाचं मनाली येथे चित्रीकरण होणार आहे. ज्याची तयारी सनी देओल ब-याच काळापासून करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सनी देओल मनालीमध्येच ठाण मांडून आहे. करणच्या पहिल्या चित्रपटाचं झी स्टुडिओ आणि धर्मेंद्र सादरीकरण करत आहेत. सनीच्या कारकिर्दीतला सर्वात हिट चित्रपट ठरलेल्या गदरचीही निर्मिती झी स्टुडिओनं केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सनीनं झी स्टुडिओशी हातमिळवणी केली आहे. 

Web Title: Actor Sunny Deol's son debut from "This" movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.