अभिनेते बनले व्यावसायिक

By Admin | Updated: June 25, 2016 01:17 IST2016-06-25T01:17:56+5:302016-06-25T01:17:56+5:30

छोट्या पडद्यावरील कलाकारांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललीय. सिनेमातील कलाकारांप्रमाणेच टीव्ही कलाकारांना रसिकांकडून भरभरुन प्रेम मिळतंय

Actor became a professional | अभिनेते बनले व्यावसायिक

अभिनेते बनले व्यावसायिक

छोट्या पडद्यावरील कलाकारांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललीय. सिनेमातील कलाकारांप्रमाणेच टीव्ही कलाकारांना रसिकांकडून भरभरुन प्रेम मिळतंय. मात्र या क्षेत्रात दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चाललीय. त्यामुळंच की काय हे कलाकार अभिनयाच्या करिअरशिवाय साईड बिझनेससुद्धा करतात. कुणी स्पोर्टस टीमचा मालक आहे तर कुणी फूड एंड बिवरेजेसच्या व्यवसायात गुंतलाय. पाहूया कोण कोण आहेत असे कलाकार...

रोनित रॉय
कसोटी जिंदगी की या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रोनित रॉय यांनी टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलंय. उडान, टू स्टेट्स, बॉस, स्टुंडण्ट आॅफ द इयर अशा 30 हून अधिक सिनेमात त्यांनी काम केलंय. याशिवाय अदालत, सरकार, कसम से, इतना करो ना मुझसे प्यार अशा 20 पेक्षा अधिक मालिका आणि रियालिटी शोचा समावेश आहे. असं असलं तरी अभिनयाच्या या इनिंगससह रोनित एक एसीई सिक्युरीटी एंड प्रोटेक्शन नावाची कंपनीही चालवतात.

शब्बीर अहलुवालिया
कुमकुम भाग्य मालिकेत शब्बीरनं प्रमुख भूमिका साकारलीय. अनेक टीव्ही मालिकांसह शूटआऊट एट लोखंडवाला आणि काही सिनेमांमध्येही त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळालीय. अभिनयाच्या या इनिंगसह शब्बीर फ्लाइंग टर्टल्स नावाच्या प्रोडक्शन हाऊसचा को-ओनरसुद्धा आहे.

करण कुंद्रा
कितनी मोहब्बत है या मालिकेतील अभिनयामुळं अभिनेता करण कुंद्रा तरुणाईचा फेव्हरेट ठरलाय. अभिनयाच्या या कारकिर्दीसह करण बिल कॉर्प नावाचं एक कॉल सेंटरसुद्धा चालवतो.

अर्जुन बिजलानी
नागिन, मेरी आशिकी तुमसे ही है या मालिकेतील भूमिकेमुळं अभिनेता अर्जुन बिजलानी यानं रसिकांवर जादू केलीय. एक उत्तम कलाकार असलेला अर्जुन बीसीएल (बॉक्स क्रिकेट लीग) टीम मुंबई टायगर्सचा स्टेक होल्डर आहे. शिवाय मुंबईत एका वाईन शॉपचा मालकसुद्धा आहे.

Web Title: Actor became a professional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.