अभिजित, नेहा आणि श्रुती यांची दोस्ती भारी

By Admin | Updated: March 20, 2016 02:13 IST2016-03-20T02:13:38+5:302016-03-20T02:13:38+5:30

मराठी इंडस्ट्रीचे सुंदर कलाकार अभिजित खांडकेकर, नेहा पेंडसे आणि श्रुती मराठे या तिघांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हे तिन्ही कलाकार जरी कधी

Abhijit, Neha and Shruti's friendship are huge | अभिजित, नेहा आणि श्रुती यांची दोस्ती भारी

अभिजित, नेहा आणि श्रुती यांची दोस्ती भारी

मराठी इंडस्ट्रीचे सुंदर कलाकार अभिजित खांडकेकर, नेहा पेंडसे आणि श्रुती मराठे या तिघांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हे तिन्ही कलाकार जरी कधी एका चित्रपटातून पडद्यावर झळकले नसले, तरी या तिन्ही मराठी कलाकारांची दोस्ती मात्र लय भारी असल्याचे अभिजित खांडकेकर याने लोकमत सीएनएक्सला सांगितले.
अभिजित म्हणाला, श्रुती मराठे आणि मी एकाच एरियामध्ये राहतो; त्यामुळे सुखदा, मी व श्रुती नेहमी डिनरला वगैरे सोबतच जातो. नुकतेच श्रुतीने आणि मी कॉफीला जायचे प्लॅनिंग केले होते आणि त्या कॉपी शॉपच्या जवळच नेहाच्या मालिकेचे शूटिंग चालू होते. त्यामुळे साहिजकच नेहादेखील आमच्या कॉफी पार्टीमध्ये सामील झाली. आम्ही तिघांनी मिळून खूप धमाल व मस्ती केली. असो. या सेलीब्रिटींची ही दोस्ती अशीच रंगू दे, यासाठी शुभेच्छा!

Web Title: Abhijit, Neha and Shruti's friendship are huge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.