अभयला मिळाली पूजाची साथ

By Admin | Updated: July 18, 2014 11:27 IST2014-07-18T11:19:05+5:302014-07-18T11:27:05+5:30

५0 हून जास्त नव्या चेहर्‍यांना पछाडत माजी मिस इंडिया पूजा गुप्ताने सेतू श्रीराम यांचा ‘स्नाफू’ हा चित्रपट मिळवला आहे.

Abhayya received Pooja with | अभयला मिळाली पूजाची साथ

अभयला मिळाली पूजाची साथ

५0 हून जास्त नव्या चेहर्‍यांना पछाडत माजी मिस इंडिया पूजा गुप्ताने सेतू श्रीराम यांचा ‘स्नाफू’ हा चित्रपट मिळवला आहे. फिल्म युनिटने २0 दिवसांच्या टॅलेंट हंट ऑडिशन्सनंतर पूजाला हिरोईन म्हणून फायनल केले. दिग्दर्शक सेतू श्रीराम यांनी सांगितले की,‘आम्हाला या चित्रपटासाठी जशी अभिनेत्री हवी होती, ती पूजाच्या रूपात मिळाली. पूजा या चित्रपटात आनिया नावाच्या एका तरुणीची भूमिका निभावणार आहे. एका छोट्या शहरातील आनिया करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी मोठय़ा शहरात येते. पूजाने रेमो डिसुजाच्या ‘फालतू’ या चित्रपटातून बॉलीवूड एंट्री केली होती. त्यानंतर तिने ‘गो -गोवा-गॉन’, ‘शॉर्टकट रोमिओ’सारख्या चित्रपटांमध्ये काम केल. सेतू श्रीराम यांचा ‘स्नाफू’ हा चित्रपट एक कॉर्पोरेट थ्रिलर असून, यात पूजासोबत अभय देओल दिसणार आहे. अभय चित्रपटात निगेटिव्ह भूमिकेत दिसेल.

 

Web Title: Abhayya received Pooja with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.