अभय झाला रिपोर्टर
By Admin | Updated: April 2, 2016 02:17 IST2016-04-02T02:17:49+5:302016-04-02T02:17:49+5:30
प्रायोगिक रंगभूमीवर आपल्या अभिनयानं लक्ष वेधून घेतलेला अभय महाजन रिपोर्टर झाला आहे. ‘रंगा पतंगा’ चित्रपटात त्यानं इलेक्ट्रॉनिक चॅनेलच्या रिपोर्टरची भूमिका केली आहे.

अभय झाला रिपोर्टर
प्रायोगिक रंगभूमीवर आपल्या अभिनयानं लक्ष वेधून घेतलेला अभय महाजन रिपोर्टर झाला आहे. ‘रंगा पतंगा’ चित्रपटात त्यानं इलेक्ट्रॉनिक चॅनेलच्या रिपोर्टरची भूमिका केली आहे. यू ट्यूबवर खूप लोकप्रिय असलेल्या टीव्हीएफ पिक्चर्स या वेब सीरिजमुळे सध्या अभय चर्चेत आहे. त्यानं काही मराठी चित्रपट केलेले असले, तरी रंगा पतंगा त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दुष्काळ कव्हर करायला आल्यानंतर जुम्मनचे बैल हरवल्याची बातमी त्याला कळते. बातमीमूल्य लक्षात घेऊन तो त्याची बातमी कव्हर करतो, संवेदनशीलपणे जुम्मनला मदतही करतो. ‘'इलेक्ट्रॉनिक वाहिनीतला रंगा-पतंगामधील रिपोर्टर हा वेगळा आहे. मकरंद अनासपुरे, संदीप पाठक यांच्यासारख्या अभिनेत्यांसह काम करायला मिळणं ही उत्तम संधी होती,’ अशी भावना अभयनं व्यक्त केली.