102 वर्षीय "बीग बी" च्या मुलाच्या भूमिकेत 75 वर्षीय ऋषी कपूर
By Admin | Updated: May 9, 2017 16:24 IST2017-05-09T15:50:11+5:302017-05-09T16:24:07+5:30
यापूर्वी कपूर अँन्ड सन्समध्ये ऋषी कपूरने आजोबांची भूमिका केली होती. या भूमिकेतील त्यांच्या अभिनयाचे सर्वच स्तरावरुन कौतुक झालं होतं.

102 वर्षीय "बीग बी" च्या मुलाच्या भूमिकेत 75 वर्षीय ऋषी कपूर
मुंबई, दि. 9 - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. उमेश शुक्ला यांच्या आगामी चित्रपटात हे दोन कलाकार महात्वाच्या भूमिकेत असणार आहेत. यामध्ये ऋषी कपूर हे अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकरणार आहेत. अमिताभ बच्चन ऋषी कपूरपेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत हे विशेष. उमेश शुक्ला यांच्या आगामी 102 नॉटआऊट या चित्रपटामध्ये मध्ये बिग बी आणि ऋषी कपूर बाप आणि मुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ऋषी कपूर यांची भूमिका अगोदर परेश रावल करणार होते.
ओ माय गॉड चित्रपटाचे दिग्दर्शनही उमेश शुक्ला यांनी केलं होतं. हा सिनेमाही एका गुजराती नाटकावर आहे. सिनेमात बिग बी 102 वर्षांचे असतील, तर त्यांचा मुलगा बाबू असेल ऋषी कपूर. दोघांनी मिळून नसीब, अमर अकबर अँथनी, कभी कभी हे सिनेमे केले होते. शशी कपूरच्या अजुबामध्येही त्यांनी काम केलं होतं. त्यामुळे दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगते, हे प्रेक्षकांना माहीत आहे. यापूर्वी कपूर अँन्ड सन्समध्ये ऋषी कपूरने आजोबांची भूमिका केली होती. या भूमिकेतील त्यांच्या अभिनयाचे सर्वच स्तरावरुन कौतुक झालं होतं. अमिताभ आणि ऋषी कपूर यांनी एकत्र काम केलेला अजुबा हा शेवटचा चित्रपटात आहे.
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी आपल्या काळात एकत्र अनेक हिट सिनेमे दिलेत. आता ही जोडी ब-याच वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहे. याबद्दल अधिक खुलासा करण्यात आलेला नाही. पण ऋषी कपूर यांनी टिष्ट्वटरवर अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर केला आहे. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत काम करणे आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. टीमसोबत स्क्रिप्टचे वाचन करतो आहे. अधिक माहितीसाठी प्रतिक्षा करा, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. 102 नॉट आऊटची कथा एका 102 वर्षीय वयाच्या दत्तात्रय वखारिया या व्यक्तिरेखेभोवती फिरते. दत्तात्रय यावयातही कमालीचा महत्त्वाकांक्षी असतो. याऊलट त्याचा 75 वर्षांचा मुलगा तितकाच सनकी आणि भावनाशून्य असतो.
Always a pleasure and an honour to work with him. Started reading the script with the team. For further details ,stay tuned!!! pic.twitter.com/ulxQCNUTIU— Rishi Kapoor (@chintskap) May 5, 2017