राज्यातील ४० एकपडदा चित्रपटगृहे पुन्हा सुरू होणार?

By Admin | Published: September 19, 2015 01:14 AM2015-09-19T01:14:01+5:302015-09-19T01:14:01+5:30

विविधांगी विषय, दर्जेदार मांडणी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या वैशिष्ट्यांमुळे मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटांची क्षितिजेदेखील

40 one-and-a-half showrooms will be resumed? | राज्यातील ४० एकपडदा चित्रपटगृहे पुन्हा सुरू होणार?

राज्यातील ४० एकपडदा चित्रपटगृहे पुन्हा सुरू होणार?

googlenewsNext

विविधांगी विषय, दर्जेदार मांडणी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या वैशिष्ट्यांमुळे मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटांची क्षितिजेदेखील विस्तारली असून, सातासमुद्रापार चित्रपटाचे प्रदर्शन आणि चित्रीकरण होत आहे. ही जमेची बाजू असतानादेखील मल्टिप्लेक्समध्ये आजही मराठी चित्रपटांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मल्टिप्लेक्समध्ये मराठीला ‘प्राइम टाइम’ मिळायला पाहिजे, अशी घोषणा केलेली असतानाही त्याची अंमलबजावणी मालकांकडून होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना कुणी तारू शकते तर ते एकपडदा चित्रपटगृहच. राज्यात ४०० एकपडदा चित्रपटगृहे बंद आहेत़ त्यापैकी ३० ते ४० चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुढाकार घेतला आहे. थिएटर ओनर्स अँड एक्झिक्युटर्स असोसिएशनसमवेत चित्रपट महामंडळाची बैठक झाली. त्याविषयी महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर ‘सीएनएक्सशी’ बोलताना म्हणाले, की बरीच एकपडदा चित्रपटगृहे बंद आहेत. ती सर्वच नसली तरी काही चित्रपटगृहे पुन्हा सुरू करता येतील, असा विचार सुरू आहे. एकपडदा चित्रपटगृह चालकांनी त्याला होकार दर्शविला आहे. चित्रपटगृह सुरू करण्यासाठी शासनाच्या अटी जाचक आहेत; तरीही ती सुरू करण्याच्या दृष्टीने शासनाशी
चर्चा करण्यात येणार आहे.

Web Title: 40 one-and-a-half showrooms will be resumed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.