‘एक अलबेला’ला इंग्लंडमध्ये प्रदर्शनासाठी २७ थिएटर्स उपलब्ध
By Admin | Updated: June 18, 2016 03:50 IST2016-06-18T03:50:24+5:302016-06-18T03:50:24+5:30
भगवानदादांच्या जीवनावर आधारित असणारा एक अलबेला हा चित्रपट आहे. तसेच मंगेश देसाई यांनी या चित्रपटात भगवानदादाची भूमिका साकारली आहे, तर विद्या बालन ही

‘एक अलबेला’ला इंग्लंडमध्ये प्रदर्शनासाठी २७ थिएटर्स उपलब्ध
भगवानदादांच्या जीवनावर आधारित असणारा एक अलबेला हा चित्रपट आहे. तसेच मंगेश देसाई यांनी या चित्रपटात भगवानदादाची भूमिका साकारली आहे, तर विद्या बालन ही बॉलीवूडची मोठी अभिनेत्री गीता बालीच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता देशासहित परदेशातदेखील पाहायला मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची लोकप्रियता पाहता या चित्रपटाला २४ जूनला इंग्लंडमध्ये २७ थिएटर्सचा आॅफिशियली रीलीज मिळाला आहे. हा मराठीतला पहिलाच असा चित्रपट आहे की, त्याला परदेशात एवढे थिएटर्स उपलब्ध झाले आहेत. महाराष्ट्र मंडळ वगैरे यांनी काही आयोजन केले नाही तर आॅफिशियली ही रीलीज असल्याचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी लोकमत आॅफिस भेटीदरम्यान सांगितले. ते म्हणाले की, दिवसाला ३ शो करण्याचे प्लॅनिंग चालू आहे. जरी दोन शो मिळाले तरी ५४ शो होतात. तसेच काही दिवसांतच ब्रिटिश संसदेमध्येदेखील या चित्रपटाची ट्रायल आहे. तर अभिनेता मंगेश देसाई म्हणाला की, भगवानदादांचे परदेशातदेखील खूप सारे चाहते आहे. चित्रपटातील काही गाण्यांना अबुधाबी, सिंगापूर, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड या ठिकाणी स्थानिक असलेल्या प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.