प्रियांकाच्या व्हेंटिलेटरमध्ये ११६ कलाकार

By Admin | Updated: April 24, 2016 01:49 IST2016-04-24T01:49:38+5:302016-04-24T01:49:38+5:30

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्रडा हिच्या मराठीच्या पदार्पणाने बरीच चर्चा रंगली होती. तसेच हळूहळू तिच्या या चित्रपटाच्या प्रत्येक गोष्ट उलगडताना दिसत आहे.

116 Artists in Priyanka Ventilator | प्रियांकाच्या व्हेंटिलेटरमध्ये ११६ कलाकार

प्रियांकाच्या व्हेंटिलेटरमध्ये ११६ कलाकार

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्रडा हिच्या मराठीच्या पदार्पणाने बरीच चर्चा रंगली होती. तसेच हळूहळू तिच्या या चित्रपटाच्या प्रत्येक गोष्ट उलगडताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी तिने चित्रपटाचे नाव ‘व्हेंटिलेटर’ असे घोषित केले. पण, प्रियाकांचा हा चित्रपट म्हटल्यावर त्यामध्ये कोण कलाकार असणार, या विचारात मात्र सगळेच पडलेच होते. पण, आता या गोष्टीचा उलगडा झाला आहे. या चित्रपटात एक-दोन नव्हे, तर तब्बल ११६ कलाकारांचा समावेश आहे; पण या शंभरीमध्ये शशांक शेंडे, सुकन्या कुलकर्णी, उषा नाडकर्णी, राहुल सोलापूरकर यांचा समावेश असल्याचे कळते. एवढ्या मोठ्या संख्येने मराठी कलाकार एकत्रित व एकाच चित्रपटात असण्याचा हा मराठी इंडस्ट्रीतला पहिलाच चित्रपट असेल. प्रियंका जरी हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी असली, तरी सर्व चित्रपटाचे कार्य तिची आई मधू चोप्रा सांभाळत आहेत. राजेश मापुसकर हे व्हेंटिलेटर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी यापूर्वी ‘फरारी की सवारी’ हा चित्रपट केला होता. हा चित्रपट गणेशोत्सवात प्रदर्शित होणार आहे. असो. पण प्रियकांच्या या चित्रपटातील कलाकारांचा हा आकडा पाहता सर्वांना धक्का बसला असणार!

Web Title: 116 Artists in Priyanka Ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.