Fact Check: उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या रॅलीत पाकिस्तानी झेंडा? नाही, तो दावा खोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 01:32 PM2024-05-21T13:32:26+5:302024-05-21T13:33:35+5:30

Fact Check: ठाकरे गटाचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता.

Fact Check: Pakistani flag in Uddhav Thackeray's Shiv Sena rally? No, that claim is false | Fact Check: उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या रॅलीत पाकिस्तानी झेंडा? नाही, तो दावा खोटा

Fact Check: उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या रॅलीत पाकिस्तानी झेंडा? नाही, तो दावा खोटा

Created By: Newschecker
Translated By: ऑनलाइन लोकमत

उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या चेंबुर येथील रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्याचा दावा केला जात होता. ठाकरे गटाचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. याबाबत फॅक्ट चेक करणाऱ्या संस्थेने देसाई यांच्या इन्स्टा पोस्टमधील व्हिडीओ पाहिला व रोडशो १४ मे २०२४ ला झाल्याचे समोर आले. 

या व्हिडीओचे अर्काईव्ह व्हर्जन तुम्ही इथे पाहू शकता...



हा रोड शो २० मे रोजी मतदान होणार असल्याने आयोजित करण्यात आला होता. या रोडशोचे ठिकाण, तेथील फ्लायओव्हर आणि त्यावरील होर्डिंग्सदेखील या व्हिडीओत पाहण्यात आली. तसेच फॅक्ट चेकरना हे लोकेशन गुगल मॅपमध्येही सापडले. 
त्यानंतर न्यूजचेकरने "शिवसेना पाकिस्तानी ध्वज अनिल देसाई रॅली" अशा कीवर्डचाही शोध घेतला. आम्हाला अशा घटनेबद्दल कोणत्याही विश्वासार्ह बातम्या मिळाल्या नाहीत. व्हायरल व्हिडिओमधील ध्वजावर पाकिस्तानच्या ध्वजाची वेगळी पांढरी पट्टी नाही. ईदच्या मिरवणुकीदरम्यान उंचावलेल्या इस्लामिक ध्वजांसारखेच व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ध्वजात पांढरा चंद्रकोर आणि मध्यभागी तारा आहे. त्याच्याभोवती लहान पांढऱ्या ताऱ्यांनी वेढलेले आहे. अशा प्रकारे व्हायरल दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. 

निष्कर्ष - सोशल मीडियावरील व्हायरल दाव्याची सत्यता पडताळली असता उद्धव ठाकरे गटाच्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्याचा दावा खोटा आहे.  

(सदर फॅक्ट चेक Newschecker या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check: Pakistani flag in Uddhav Thackeray's Shiv Sena rally? No, that claim is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.