Fact Check : बुरखा घातलेल्या व्यक्तीचा हा व्हिडीओ पाकिस्तानचा, लोकसभा निवडणुकीशी त्याचा संबंध नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 01:53 PM2024-04-26T13:53:02+5:302024-04-26T14:18:49+5:30

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती बुरखा घालून मतदानासाठी आल्याचे दिसत आहे, यावर बनावट मतांचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या व्हिडिओचे वास्तव काही वेगळेच आहे.

fact check news this video of man in burqa from pakistan has no connection with lok sabha elections | Fact Check : बुरखा घातलेल्या व्यक्तीचा हा व्हिडीओ पाकिस्तानचा, लोकसभा निवडणुकीशी त्याचा संबंध नाही

Fact Check : बुरखा घातलेल्या व्यक्तीचा हा व्हिडीओ पाकिस्तानचा, लोकसभा निवडणुकीशी त्याचा संबंध नाही

Claim Review : लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी बुरखा घालून बोगस वोटिंग करणारी मुस्लीम व्यक्ती ताब्यात
Claimed By : Facebook User
Fact Check : दिशाभूल

Created By: आज तक
Translated By : ऑनलाइन लोकमत

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभा देशभरात जोरदार सुरू आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये “बुरखा तसाच राहू द्या, बुरखा काढू नका, बुरखा काढला तर गुपित उघड होईल” असं लिहिलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एका मुस्लिम व्यक्तीला बुरखा घालून बनावट मतदान करताना पकडण्यात आल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ एका पोलिस ठाण्यातील दिसत आहे, यामध्ये गणवेशातील एक व्यक्ती एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरून बुरखा काढताना दिसत आहे. बुरखा काढल्यानंतर एक दाढीवाला व्यक्ती बाहेर येतो. 

हा व्हिडीओ शेअर करताना युजर्स लिहित आहेत, “सलमा नगमा इत्यादींना बुरखा घालून खोटे मत टाकण्यात आले आहे. यावेळी कडकपणा आहे. त्यामुळे बनावट मतदानासाठी येणाऱ्या अशा अनेक महिला पकडल्या जात आहेत. मुलींनो ऐका, खोट्या मतदानासाठी खूप कठोर शिक्षा आहे.

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या कथित पोलिस अधिकाऱ्याचे बुरखा घातलेल्या व्यक्तीला पकडल्याबद्दल कौतुक केले जात आहे.

आज तक फॅक्ट चेकमध्ये आढळून आले की, हा व्हिडीओ पाकिस्तानचा असून जुना आहे. याचा भारतात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.

व्हिडीओचे सत्य कसे जाणून घेतले?

व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्स उलट शोधून, आम्हाला हा व्हिडीओ एका पाकिस्तानी फेसबुक पेजवर सापडला. १८ जून २०२३ रोजी येथे पोस्ट केले होते. येथे अपलोड केलेला व्हिडीओ चांगल्या दर्जाचा आहे. या व्हिडिओमध्ये एक लोगो आहे यावर "कॅपिटल सिटी पोलिस लाहोर" लिहिलेले दिसत आहे. हा लोगो लाहोर शहर पोलिसांच्या लोगोशी जुळतो. 

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जवानाच्या हातावर पाकिस्तानचा ध्वजही दिसत आहे. कॉन्स्टेबलचा गणवेशही लाहोर पोलिसांच्या गणवेशाशी जुळतो. मागच्या भिंतीवर एक बोर्ड आहे ज्यामध्ये उर्दू लिखाण दिसत आहे.

यावरून  हेच समजते की, हा व्हिडीओ पाकिस्तानमधील लाहोरमधील कोणत्यातरी पोलीस ठाण्याचा आहे. पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनीही जून २०२३ मध्ये ते शेअर केले होते. १९ जून २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात हा व्हिडीओ लाहोरमधील जमान पार्क नावाच्या भागातील असल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र, या व्हिडीओमागील सत्य काय आहे आणि तो लाहोरच्या कोणत्या पोलीस ठाण्याचा आहे हे कळू शकले नाही. याबाबत आम्ही लाहोर पोलिसांशीही संपर्क साधला आहे. पण पाकिस्तानचा जवळपास वर्षभर जुना व्हिडीओ भारतात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा असल्याचा दावा करून संभ्रम पसरवला जात असल्याचे येथे स्पष्ट झाले आहे.

अपडेट: पाकिस्तानच्या फॅक्ट चेकिंग मीडिया संस्था "सोच फॅक्ट चेक" च्या मदतीने आम्हाला कळले की हा व्हिडीओ लाहोर पोलिसांच्या दुसऱ्या X हँडलवरून १८ जून २०२३ रोजी ट्विट करण्यात आला होता. महिलेच्या वेशात आलेल्या या व्यक्तीला लाहोर पोलिसांनी अटक केली आहे. पण पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये असिफ नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला असभ्य रीतीने पुरुषाचे कपडे काढल्याबद्दल निलंबित करण्यात आल्याचेही लिहिले आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या पोलिसाच्या टी-शर्टवर असिफ असेही लिहिलेले दिसत आहे.

(सदर फॅक्ट चेक 'आज तक' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)

Web Title: fact check news this video of man in burqa from pakistan has no connection with lok sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.