Fact Check: लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर होणार? निवडणूक आयोगाच्या नावे पोस्ट व्हायरल, सत्य काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 01:13 PM2024-03-29T13:13:41+5:302024-03-29T13:14:38+5:30

Fact Check: सोशल मीडियावर यावेळचे मतदान ईव्हीएमवर नाही तर मतपत्रिकेवर होणार आहे, अशी बातमी वेगाने व्हायरल होऊ लागली आहे. 

Fact Check: Lok Sabha elections will be held on ballot paper insted of EVM? In favor of the Election Commission, the post went viral, what is the truth... | Fact Check: लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर होणार? निवडणूक आयोगाच्या नावे पोस्ट व्हायरल, सत्य काय...

Fact Check: लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर होणार? निवडणूक आयोगाच्या नावे पोस्ट व्हायरल, सत्य काय...

Created By: Vishvas News
Translated By : ऑनलाइन लोकमत

लोकसभा निवडणूक सुरु झाली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी जर मराठा समजाने प्रत्येक गावातून उमेदवार दिले तर ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक होण्याची शक्यता आहे. जिथे या आंदोलनाची शक्यता आहे तिथे प्रशासन कामाला लागले आहे. अशातच सोशल मीडियावर यावेळचे मतदान ईव्हीएमवर नाही तर मतपत्रिकेवर होणार आहे, अशी बातमी वेगाने व्हायरल होऊ लागली आहे. 

याबाबत खरे, खोटे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता निवडणूक आयोगाच्या नावे खोटी बातमी प्रसारित केली जात असल्याचे समोर आले आहे. एका वृत्तपत्राने होळी विशेष म्हणून एक गंमतीशीर बातमी छापली होती. तिलाच खरे मानून ती बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. 

'आपका अपना शिवम बामनिया' या फेसबुक पेजवर 25 मार्च रोजी या बातमीचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. भारत सरकारने लोकसभा निवडणुकीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, असे म्हणत आयोगाच्या नवीन सूचना: मतदान बॅलेट पेपरद्वारे केले जाईल, ईव्हीएमद्वारे नाही." अशी ही बातमी आली होती. ही बातमी खरी असल्याचे समजून अनेक युजर्स ती व्हायरल करत आहेत. ही पोस्ट अर्काईव्ह तुम्ही इथे पाहू शकता...

कशी केली पडताळणी...
व्हायरल पोस्टची पडताळणी करताना गुगलच्या ओपन सर्च टूलचा वापर करण्यात आला. पोस्टनुसार कीवर्ड टाकून सर्च केले गेले. सर्चमध्ये अशाप्रकारची एकही बातमी दिसली नाही. अधिक तपास करताना पीआयबीच्या फॅक्ट चेकच्या ट्विटर हँडलवर ८ मार्चची एक पोस्ट मिळाली. यामध्ये ईव्हीएमवर बंदी आणल्याचा दावा एक अफवा असल्याचे म्हटले होते. 

यानंतर ही बातमी छापलेल्या इव्हिनिंग टाईम्सच्या संपादकांशी संपर्क साधण्यात आला. नथमल शर्मा यांनी होळीच्या निमित्ताने एक विशेष लेख गंमत म्हणून छापला असल्याचे त्यांनी सांगितले. तो खरा नाही अशीही त्यांनी पुष्टी केली. तसेच निवडणूक आयोगाशीही संपर्क साधण्यात आला. त्यांनीही ही अफवा असल्याचे म्हटले आहे. 

ज्या अकाऊंटवरून ही बातमी शेअर करण्यात आली त्यालाही संपर्क साधण्यात आला. या पेजला चार हजार लोक फॉलो करतात. त्याचा संचालक भोपाळचा राहणारा आहे. 

निष्कर्ष: काही लोक होळीच्या निमित्ताने विनोद म्हणून प्रसिद्ध झालेल्या बातम्या खऱ्या असल्याचे मानून शेअर करत आहेत, असे समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केल्याचा दावा खोटा आहे. 

(सदर फॅक्ट चेक 'विश्वास न्यूज' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check: Lok Sabha elections will be held on ballot paper insted of EVM? In favor of the Election Commission, the post went viral, what is the truth...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.