VIDEO: Priyanka Chopra gets the People's Choice Award for the second time | VIDEO : प्रियंका चोप्राने दुस-यांदा पटकावला 'पीपल्स चॉईस अवॉर्ड'
VIDEO : प्रियंका चोप्राने दुस-यांदा पटकावला 'पीपल्स चॉईस अवॉर्ड'

ऑनलाइन लोकमत

लॉस अँजिलिस, दि.  19 -  बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने 2017 च्या 'पीपल्स चॉईस अवॉर्ड'मध्ये फेव्हरेट ड्रामॅटिक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. अमेरिकन टीव्ही सीरिज 'क्वॉन्टिको'तील भूमिकेसाठी प्रियांकाला 'पीपल्स चॉईस अवॉर्ड'ने गौरवण्यात आले आहे.  दरम्यान प्रियंकाने दुस-यांदा 'पीपल्स चॉईस अवॉर्ड' पटकावला आहे. 
 
प्रियंकाने एले न पोम्पिओ आणि वियोला डे विज यांना मागे सोडत  'पीपल चॉईस अवॉर्ड 2017' मधील फेव्हरेट ड्रामॅटिक अभिनेत्रीच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. 'पोम्पिओ, वियोला डे विज आणि अन्य अभिनेत्रींसोबत नामांकन मिळाल्यामुळे सन्मानित झाल्याची भावना आहे',अशी प्रतिक्रिया प्रियंकाने पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली. 
'माझ्यासोबत या श्रेणीमध्ये नामांकन मिळालेली प्रत्येक अभिनेत्री सर्वोत्तम आहे', असे सांगत प्रियंकाने टीममधील सर्व कलाकारांचे आभार मानले. 
 
2016 मध्येही ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ने सन्मानित 
बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने २०१६ चा ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ पटकावला आहे. अमेरिकन टी.व्ही. मालिका ‘क्वान्टिको’तील भूमिकेसाठी प्रियंकाला हा अवॉर्ड मिळाला. 'क्वॉन्टिको'ची कथा अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेवर आधारित आहे. या मालिकेत तिने प्रशिक्षणार्थी एफबीआय एंजटची भूमिका साकारली होती.