VIDEO: - If you do that, you will kill yourself - Kareena Kapoor | VIDEO : ... अशी फसले तर स्वतःलाच ठार करेन - करिना कपूर

VIDEO : ... अशी फसले तर स्वतःलाच ठार करेन - करिना कपूर

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 -  निर्माता-दिग्दर्शक करण जौहरचा टीव्ही शो 'कॉफी विथ करण'मध्ये करिना कपूर आणि सोनम कपूर पाहुणे म्हणून येणार आहेत.  या दोघींच्या शोचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये करिना आणि सोनमने खूप धम्माल मस्ती केल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे 'कॉफी विथ करण'चा हा एपिसोड करिना आई होण्यापूर्वीचा आहे. 
 
या शोमध्ये, प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोन या दोघींपैकी 'सर्वात चांगली अभिनेत्री कोण?', असा प्रश्न करणने करिनाला विचारल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता तिने उत्तर दिले की 'दोन्ही अभिनेत्रींनी हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे'. यावर सोनमनेही हसून प्रतिक्रिया दिली की तिनेदेखील हॉलिवूडची वाट धरली आहे.  यावरुन सोनम कपूरदेखील लवकरच हॉलिवूड सिनेमामध्ये दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
यानंतर करणने करिनाला विचारले की, बॉलिवूडचा चॉकलेट हिरो आणि करिनाचा भाऊ रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोन आणि कतरिना कैफ यांच्यासोबत एका लिफ्टमध्ये फसल्यास, अशा परिस्थितीत तू काय करशील?. करणच्या या प्रश्नावर करिनाने अगदी मजेशीर उत्तर दिले आहे. 'दीपिका आणि कतरिनासोबत एका लिफ्ट फसले तर स्वतःलाच ठार करेन', असे गंमतीशीर उत्तर करिनाने करणला दिले. 

Web Title: VIDEO: - If you do that, you will kill yourself - Kareena Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.