Sureshkumar Shinde's grandson's relationship with his granddaughter | श्रीदेवीच्या लेकीचे किसींग फोटो व्हायरल, सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाबरोबर जुळले सूर
श्रीदेवीच्या लेकीचे किसींग फोटो व्हायरल, सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाबरोबर जुळले सूर

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २ - चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तिच्या सौदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता ती आणखी एका कारणासाठी चर्चेत आली आहे. जान्हवीचे प्रियकर शिखर पहारीयाबरोबरचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. 
 
महत्वाचं म्हणजे जान्हवीचा प्रियकर शिखर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदेंचा नातू आहे. पिंकविला डॉट कॉमच्या वृत्तानुसार शिखर हा वीर पहरीयाचा भाऊ आहे. हा तोच वीर पहारीया आहे ज्याचे सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बरोबर प्रेम प्रकरण सुरु आहे. 

 
जान्हवी आणि शिखरचे मित्रांसोबतच्या पार्टीमधील काही फोटो व्हायरल झाले आहे. हे फोटो खूपच उत्तेजक असून, शिखर-जान्हवीचे किसिंगचे हे फोटो आहेत. जान्हवी सध्या अमेरिकेत असून, तिथे अभिनयाचे प्रशिक्षण घेत आहे. सारा आणि जान्हवी बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच चर्चेत आल्या आहेत.  
 
Web Title: Sureshkumar Shinde's grandson's relationship with his granddaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.