Sonam got to reply to Abhay Deol | अभय देओलला प्रत्युत्तर देणं सोनमला पडलं महागात

अभय देओलला प्रत्युत्तर देणं सोनमला पडलं महागात

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - बॉलिवूड अभिनेता अभय देओलने गोरे होण्याच्या क्रिमची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर काल फेसबुक पोस्टद्वारे टीका केली होती. अभयच्या या टीकेला उत्तर देताना सोनम कपूरने आज एक पोस्ट केली, पण तिला ती पोस्ट महागात पडली आहे. आपण केलेली पोस्टमुळे आपणच ट्रोल होतोय असं दिसल्यावर सोनमने आपली पोस्ट डिलीट केली.
अभय देओलने काल त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या शाहरुख खान पासून दीपिका पादुकोन, सोनम कपूर, शाहिद कपूर, नंदिता दास, जॉन अब्राहम, सिद्धार्थ मल्होत्रा यांची खिल्ली उडविली होती. अभयच्या या पोस्टमध्येला सोनम कपूरने उत्तर दिले. पण तिला ते महागात पडले. सोनमचे चाहते तिला पाठिंबा देतील आणि अभयची खिल्ली उडवतील असे तिला वाटत होते. पण, तसे काहीच झाले नाही. उलट नेटीझन्सने सोनमलाच धारेवर धरले.

 

सोनमने अभयची चुलत बहीण ईशा देओलचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ईशा एका फेअरनेस ब्रॅण्डची जाहिरात करताना दिसते. सोनमने तो फोटो ट्विट करत लिहिले, अभय मी यावर तुझं मत जाणू इच्छिते. सोनमच्या या ट्विटला उत्तर देताना, ह्यहे ही चुकीचेच आहे,ह्ण असं अभय म्हणाला. माझी मतं जाणून घेण्यासाठी माझी पोस्ट वाच, असेही त्याने सोनमला सांगितले. पण एवढ्यावरही थांबेल ती सोनम कसली. तिने पुढे लिहिले, ही जाहिरात मी 10 वर्षांपूर्वी केली होती. तेव्हा मला याचे परिणाम माहित नव्हते. हे सगळ्यांसमोर आणण्यासाठी तुझे आभार. याला उत्तर देताना अभयने लिहिले की, तू अधिक प्रतिभाशाली हो आणि तुला मिळालेल्या ताकदीचा योग्य वापर कर. अशाप्रकारे सोशल मीडियावर या दोन्ही कलाकरांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळतेय.
फेअरनेस क्रिमच्या जाहिराती काही विचार न करता खोटा दावा तर करतातच शिवाय काळ्या रंगापेक्षा गोरा रंग चांगला हा विचार विकतात. या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला हे सांगणार नाही की हे चुकीचं आहे. गोऱ्या रंगाची त्वचा ही काळ्या किंवा सावळ्या रंगापेक्षा अधिक चांगली असते अशा प्रकारच्या संकल्पनांना स्वीकारणं बंद केलं पाहिजे. असे अभयने आपल्या काल केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.

 

Web Title: Sonam got to reply to Abhay Deol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.