So Shahid Kapoor left the house, staying at Hotel Rahatoya | म्हणून शाहिद कपूरने सोडलं घर, राहतोय हॉटेलमध्ये
म्हणून शाहिद कपूरने सोडलं घर, राहतोय हॉटेलमध्ये
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरने आपले घर सोडले असून, तो आता गोरेगावच्या एका हॉटेलमध्ये राहत आहे. बॉलिवूडचे असे अनेक स्टार्स आहेत, जे स्वत:चे घर असूनही दुसऱ्याच्या घरात शिफ्ट होतात. मात्र, शाहिद घराऐवजी एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत आहे. बहुतेक जण घरात भांडण झाल्याने किंवा इतर कारणाने घर सोडतात. मात्र, शाहिदच्या घर सोडण्याचे कारण जरा वेगळं आहे. त्याला शूटिंगला जाताना-येताना ट्रॅफिकचा त्रास होतोय त्यामुळेच त्याने हॉटेलमध्ये  राहण्याचा निर्णय घेतला आहे. होणारा ट्रॅफिकचा त्रास होय.
 
शाहिदच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे देखील आहेत. पण हे कलाकारदेखील फिल्मसिटीच्या जवळच राहू लागले आहेत. घरापासून शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्यात शाहिदला आपला वेळ वाया घालवायचा नाही म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. 
 
त्यामुळे शूटिंग संपेपर्यंत शाहिद कपूर याच हॉटेलमध्ये राहणार आहे. शाहिदला शूटिंग ठिकाणी पोहोचायला आणि पुन्हा घरी वापस यायला सुमारे 4 तास वाया जायचे. मात्र आता हॉटेलता राहायला लागल्यापासून तो रोज सकाळी शुटिंग ठिकाणी लवकर पोहचतो आणि रात्री उशिरापर्यंत शूट करतो. या चित्रपटात शाहिद दोन लूकमध्ये दिसणार असून त्यासाठी त्याला वर्कआउटदेखील करावे लागत आहे. 
 
Web Title: So Shahid Kapoor left the house, staying at Hotel Rahatoya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.